आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jain Irrigation Issue At Jalgaon, News In Marathi

जैन इरिगेशनच्या खात्यातून साडेआठ लाख रुपये लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बनावट नाव व सही करून जैन इरिगेशन सिस्टिम कंपनीच्या बँक ऑफ बडोदाच्या विसनजीनगर शाखेतील खात्यातून 8 लाख 57 हजार 200 रुपये काढून घेतले. 2 जुलै रोजी ही घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेतील जैनच्या अकाउंटमधून जयदेव नारायण देसाई या नावाचा चेक जमा करून पैसे काढण्यात आले आहेत. दरम्यान, या नावाच्या व्यक्तीला चेक दिलेला नसल्याचे लक्षात आल्यानंतर शनिवारी जैनचे कर्मचारी मोहन अस्तबंद यांनी फिर्याद दिली. त्यावरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.