आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन यापुढे निवडणूक लढणार नाहीत; जळगावातील एका कार्यक्रमात केली स्वत:च घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या माजी अामदार सुरेश जैन यांनी अाता निवडणूक न लढण्याची महत्त्वपूर्ण घाेषणा एका कार्यक्रमात केली. तसेच राजकारण हे निवडणुकीपुरते मर्यादित असावे; मात्र निवडणूक संपली की सगळ्यांंनी विकासकामांसाठी एकत्र येणे गरजेचे अाहे. मामा (अामदार सुरेश भाेळे) अाता मी तुमचा स्पर्धक नाही, नऊ वेळा अामदार करून जनतेने भरभरून प्रेम केले अाहे. त्यामुळे मी अाता निवडणूक लढणार नसल्याने मला मत मागायला जायचे नाही, तुम्ही निश्चिंत हाेऊन शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करा, असा सल्लादेखील जैन यांनी दिला. दरम्यान, अामदार व महापाैरांच्या उपस्थितीत अापल्या राजकीय भवितव्याचा निर्णय माजी अामदार जैन यांनी जाहीर करत पुनरागमनाच्या चर्चेला एक प्रकारे ब्रेक लावल्याने खळबळ उडाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...