आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात कांद्याच्या दराने गाठली सत्तरी, बाजार समितीत अावक घटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्वयंपाकघरातीलअत्यावश्यक बाब असणाऱ्या कांद्याचा भाव गेल्या अाठवडापासून वधारायला सुरुवात झाली अाहे. गुरुवारी किरकाेळ बाजारात ६५-७० रुपये प्रतिकिलाे दराने कांद्याची विक्री झाली. त्यातही रांगडा कांदा ७५ रुपयांचा भाव खात हाेता. स्थानिक बाजार समितीत कांद्याची अावकही माेठ्या प्रमाणात घटली अाहे. त्यामुळे अागामी काळात कांद्याच्या दरात अाणखी वाढ हाेण्याची शक्यता अाहे.

कांद्याने दिल्लीचे सरकार हलवल्याचा इतिहास अाहे. गेल्या अाठ-दहा वर्षांत अनेकदा कांद्याची मागणी पुरवठ्यात हाेणाऱ्या तफावतीने कांद्याच्या भाववाढीचे प्रकार घडले अाहेत. यंदा कांद्याचे उत्पादन पावसाअभावी घटले अाहे. त्यातच सध्याच्या हंगामातही पावसाने माेठा ताण दिल्याने कांद्याचे उत्पादन घटणार अाहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही अाहे ताे कांद्याचा साठा करून ठेवला असून, शेतकऱ्यांकडेही कांदा शिल्लक नसल्याची स्थिती अाहे.

अाठवडाभरात माेठी वाढ
^गेल्याअाठवड्यात २०-२५ रुपये किलो असलेला कांदा दाेन दिवसांपूर्वी अचानक ५० रुपये किलोवर पाेहाेचला. गुरुवारी ताे ७० रुपये किलाेने मिळत हाेता. सध्या श्रावण सुरू असल्याने कांद्याचा वापर कमी हाेताे. मात्र, कांद्याशिवाय जेवणात मजाही येत नाही. भाव वाढल्याने प्रमाण कमी हाेईल एवढेच. सुधीरकाेल्हे, ग्राहक
^जिल्ह्यातकांद्याची अावक नाशिक येथून हाेते. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून कांद्याची अावक घटली अाहे. दिवसाला केवळ एखाददुसरी गाडी येत अाहे. त्यामुळे दरात वाढ झाली अाहे. किरकाेळ व्यापारीही चढ्या भावाने कांदा विकत घ्यायला नाखुश अाहेत. खुशालचाैधरी, कांदे व्यापारी, बाजार समिती

केवळ ४० क्विंटलची अावक
जळगावकृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या हंगामात दरराेज ५०० ते ७०० क्विंटल कांद्याची अावक हाेत असते. तसेच सामान्य स्थितीत दरराेज शंभर-सव्वाशे क्विंटल कांदा विक्रीसाठी येताे. १० ते १५ कांद्याचे व्यवहार करणारे व्यापारी अाहेत. मात्र, गेल्या अाठवडाभरापासून बाजार समितीत दरराेज केवळ ३० ते ४० क्विंटलच कांद्याची अावक हाेत अाहे. त्यामुळे कांद्याचा व्यापार करणारे व्यापारी हातावर हात धरून बसले अाहेत.