आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्गावर अडीच लाख जळगावकरांचा दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास; प्रशासन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कंटेनर-कारच्या शनिवारी रात्री झालेल्या अपघातानंतर जीवघेण्या महामार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला असून डिसेंबर महिन्याच्या १० दिवसांत अपघातात महामार्गाने बळी घेतले आहेत. चौपदरीकरण आज होईल, उद्या होईल या आशेवर दररोज अडीच लाख जळगावकर महामार्गावरून अपघाताची टांगती तलवार घेऊन अक्षरश: जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. महामार्ग पोलिसांच्या सर्वेक्षणानुसार वर्षाला सरासरी ३५०वर अपघात हाेतात. त्यात १६० लाेकांचे बळी गेले असून प्रशासन अहवालांचे कागदी घोडे नाचवते असे वारंवार निदर्शनास आले आहे. महामार्गाच्या रूपाने शहरवासीयांच्या जीवावर उठलेल्या अत्यंत ज्वलंत समस्येवर उपाय करण्यासाठी स्वयंसेवी संघटना, संस्था, जागरूक नागरिक, राजकीय पक्षांनी पुढाकार घेत प्रभावी दबावगट निर्माण करण्याची आता गरज आहे.
जळगावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे शहराची लाख लाेकसंख्या महामार्गाच्या भागांत विभागली गेली अाहे. बांभाेरी पुलापासून ते नशिराबाद नाका अशा १० किलाेमीटर लांबीच्या क्षेत्रातील नागरिक महामार्गामुळे प्रभावित हाेतात. महामार्गाच्या दोन्ही बाजूला शहराचा विस्तार होत असल्याने नागरिकांचा वाहन वापर ७० ते ९० चौरस किलाेमीटरपर्यंत वाढला अाहे. सध्याच्या महामार्गासाठी एकूण ६० मीटर जागा असली तरी त्यातील प्रत्यक्ष वाहतुकीसाठी केवळ १० मीटर जागा उपयाेग येत अाहे. महामार्गावर समांतर रस्ते, दुभाजक अशी काेणतीही व्यवस्था नसल्याने अवजड छाेट्या वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरते.

२०१५ मधील महामार्गावरील अपघात
{ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, एसएसबीटी महाविद्यालय, त्रिमूर्ती, नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटीचे सुमारे हजार विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी.
{ चेसीस ब्रेक कंपनीचे सुमारे एक हजार कामगार-कर्मचारी.
{ बांभोरी, पाळधी येथील आैद्यागिक वसाहतीत रोज जाणारे हजारो कर्मचारी.
(दरराेजच्या वाहतुकीची सरासरी) लुईस बर्जर कंपनीने केलेला वाहतुकीचा सर्व्हे
सरासरी घटना २३६६०

...अशी अाहे वाहतुकीची वर्दळ
३१२ अपघातांचीसंख्या
१२३ अपघातांमध्ये मृत्युमुखी

अपघातग्रस्त चौक... बांभाेरी पूल, खाेटेनगर, दादावाडी, गुजराल पेट्राेलपंप, मानराज पार्क, शिव काॅलनी, शासकीय अभियांत्रिकी, शासकीय अायटीअाय, अग्रवाल हाॅस्पिटल, प्रभात चाैक, अाकाशवाणी चाैक, इच्छादेवी चाैक, तांबापुरा-सिंधी काॅलनी क्राॅसिंग, अजिंठा चाैक, कालिंकामाता मंदिर चाैक, अयाेध्यानगर प्रवेशद्वार, गाेदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, दूरदर्शन केंद्र.

१० किलाेमीटरचा प्रवास अवघड... राष्ट्रीय महामार्ग अाेलांडून जाणे, दूरदर्शन केंद्र ते बांभाेरी पुलापर्यंतचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना महामार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. महामार्गाचाच वापर करावा लागत असताना काेठेही समांतर रस्ता, दुभाजक, भुयारी मार्ग याची व्यवस्था नाही. त्यामुळे तब्बल १० किलोमीटरपर्यंत प्रवास नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो.

डीपीअारात अडकले पूल, भुयारी मार्ग
चाैपदरीकरणझाले तर शहरातील अपघातांची समस्या सुटणार असल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री यांच्या कार्यक्रमात शहरातील महामार्गासाठी ४१५ काेटी रुपयांच्या कामांची घाेषणा केली. जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कालिंकामाता मंदिर ते अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौक ते आकाशवाणी चौक, प्रभात चौक ते शासकीय तंत्रनिकेतन असे उड्डणपूल बांधणे, भुयारीमार्ग अाणि समांतर रस्ते करणे या कामांचा समावेश हाेता. मात्र, अद्यापही हा प्रस्ताव डीपीअार (डिटेल प्राेजेक्ट रिपाेर्ट) तयार करण्याच्याच स्टेजला अाहे. त्यात राजकीय पाठपुराव्याचा अभाव असल्याची स्थिती अाहे.

समांतररस्त्याबाबत मनपाच्या भूलथापा
महापालिकेनेराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सन २०११मध्ये शहरातील महामार्गाची जागा समांतर रस्त्यासाठी स्वत:कडे हस्तांतर करून घेतली. महामार्गावरील अपघात थांबत नसल्याने प्रमिला पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. पालिकेने सन २०१२-१३पासून तर सन १४-१५पर्यंत टप्प्यात समांतर रस्ते पूर्ण करणे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले हाेते. यात पहिल्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात ११ कोटीं रुपयांची तरतूद केल्याची माहिती हाेती. वर्षे उलटूनही पालिकेने या विषयाकडे गांभीर्याने पाहिल्याने डाॅ. राधेश्याम चाैधरी यांनी पालिकेविराेधात आैरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल केली अाहे.

महामार्गासाठी ४१५ काेटींच्या कामांची केवळ घाेषणा; कागदी घोडे नाचवण्यातच वेळ वाया
नागरिक, स्वयंसेवी संस्था, संघटनांचा दबावगट हवा
अपघाताचीटांगती तलवार, गेल्या १० दिवसांत पाच मृत्यू
वर्षातसरासरी ३५० अपघात १६० नागरिकांचा बळी
राष्ट्रीय महामार्गावरील प्रभात चौकात अवजड वाहतूक सुरू असते. रविवार वगळता हा चौक शाळा, महाविद्यालयांकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ओलांडून जावा लागतो.

शहरातील पीसीयू (पॅसेंजर कार युनिट)
पीसीयू : महामार्गावरीलवाहतुकीची घनता माेजण्यासाठी पीसीयू हे युनिट वापरले जाते. दरराेज ताशी वाहतूक घटना माेजण्यासाठी या युनिटचा उपयाेग हाेते. त्यात खासगी कार, पिकअप कार युनिट, माेटारसायकल ०.५, सायकल ०.२, घाेडागाडी ४, ट्रक, बस, ट्रॅक्टर अशा युनिटमध्ये ही माेजणी केली जाते.
बातम्या आणखी आहेत...