आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात मनपा उपायुक्त फातलेंना ५० हजारांची लाच घेताना पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव महापालिकेच्या नगरविकास विभागातील निलंबित अभियंत्याला कामावर हजर करून घेण्यासाठी ५० हजारांची लाच घेणारे उपायुक्त राजेंद्र फातले यांना बुधवारी रंगेहाथ पकडले. उपायुक्तांच्या ‘विकास’ या बंगल्यातच त्यांनी ही रक्कम घेतली. उपायुक्त प्रदीप जगताप यांच्या जागेवर काेल्हापूर येथील राजेंद्र फातले यांची तीन महिन्यांपूर्वीच नियुक्ती झाली हाेती.

महापालिकेच्या सहा अभियंत्यांना ११ महिन्यांपूर्वी निलंबित केले हाेते. त्यांना २० मे २०१६ राेजी कामावर हजर करून घेण्याचे अादेश तत्कालीन अायुक्त संजय कापडणीस यांनी तत्कालीन उपायुक्त प्रदीप जगताप यांना दिले हाेते. मात्र, त्यानंतर दाेघांच्या बदल्या झाल्या. पाच महिने झाल्यानंतरही अभियंत्यांना हजर करून घेतले नव्हते. निलंबित अभियंत्यांपैकी अरविंद भाेसले उपायुक्त फातले यांना भेटले. त्यांनी भाेसले यांच्याकडून हजर करून घेण्यासाठी १ लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यात चांगली टिपणी पाठवण्यासाठी ५० हजार रुपये देण्याचे अगाेदर ठरले. त्यानंतर अायुक्तांची सही झाल्यानंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले.

महापालिकेच्या उपायुक्तांचे खान्देश मिल काॅलनीतील ‘विकास’ या बंगल्यात निवासस्थान अाहे. कामावर हजर करून घेण्यासाठी ५० हजार रुपये देण्याचे ठरले हाेते. त्यानंतर मंगळवारी भाेसले यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पराग साेनवणे यांना या संदर्भात तक्रार केली. त्यावरून बुधवारी सकाळी उपायुक्त फातले यांनी भाेसले यांना त्यांच्या खान्देश मिल काॅलनीतील निवासस्थानी ५० हजार रुपये घेऊन बाेलावले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून बुधवारी सकाळी ९.४२ वाजता फातले यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली. त्यांच्यावर जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
दाेन्ही घरांची तपासणी...
उपायुक्त फातले यांच्यावर एसीबीने छापा टाकल्यानंतर त्यांच्या खान्देश मिल काॅलनीतील घराची तपासणी केली. तर त्यांच्या मूळ गावी काेल्हापूर येथील घराचीही स्थानिक एसीबीच्या पथकाने तपासणी केली. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्यांच्या बंॅक खात्यांची, लाॅकर विषयी तपासणी सुरू अाहे.
बातम्या आणखी आहेत...