आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग प्राधिकरण अधिकारी पुढील आठवड्यात जळगावात; एमआयडीसी पाइपलाइन शिफ्ट करण्याचा वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात अडथळा ठरत असलेली जळगाव एमआयडीसी पाइपलाइनचा वाद आता दिल्लीतील अधिकारी सोडविणार आहेत. आठवड्याभरात दिल्लीतील महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जळगावात येऊन पाइपलाइनची पाहणी करणार आहेत.
जळगाव ते भुसावळदरम्यान साकेगावपर्यंत महामार्गाला समांतर असलेली एमआयडीसीची पाइपलाइन चौपदरीकरणासाठी दुसरीकडे शिफ्ट करावी लागणार आहे. दोन्ही विभागांमध्ये झालेल्या करारानुसार चौपदरीकरणाच्या वेळी एमआयडीसीने ही पाइपलाइन स्व खर्चाने शिफ्ट करणे अपेक्षित होते. मात्र, हा खर्च करण्यास त्यांनी असर्मथता दर्शवल्याने प्राधिकरणाची पंचाईत झाली आहे. प्राधिकरणाचे अधिकारी पुढील आठवड्यात पाइपलाइनची पाहणी करून अहवाल केंद्र सरकारला देतील.
प्राधिकरणाला नोटीस
महामार्ग चौपदरीकरणासाठी जमीन हस्तांतरणाची मुदत वर्षभरापूर्वीच संपली आहे. आता प्राधिकरणाने 30 ऑक्टोबरपूर्वी जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करावी; अन्यथा आम्हाला 300 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी नोटीस एल अँड टीने महामार्ग प्राधिकरणाला दिली आहे. एल अँड टी कंपनीने वर्षभरापासून जिल्ह्यात दोन ठिकाणी कार्यालये उभारली आहेत. त्यांचा खर्च 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पुढे काय?
एल अँड टी कंपनी पाइपलाइन असलेल्या भागात रस्त्याचे काम करणार नाही. उलटपक्षी कामाला विलंब झाल्याने तेवढय़ा भागासाठी प्राधिकरणाकडे नुकसान भरपाई मागेल तसेच हा खर्च एमआयडीसीकडून वसूल करावा, म्हणून प्राधिकरणाने एमआयडीसीला नोटीस बजावून पूर्वकल्पना दिली आहे.