आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्‍ये दुर्गंधी आणि उग्र वासाचे गूढ, नागरिक हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या दाेन दिवसांपासून शहरातील पूर्वेकडील भागात दुर्गंधीयुक्त वासाने नागरीक प्रचंड हैराण झाले अाहेत. अाठवडाभरापासून हाेणाऱ्या त्रासात दाेन दिवसात अधिक भर पडल्याने नागरिकांकडून प्रदूषण मंडळाकडे तक्रारींचा सपाटा सुरू झाला अाहे. दिवसभर घरात काेंडून घेणे अथवा ताेडाला रूमाल लावून घराबाहेर पडण्याची वेळ नागरिकांवर अाली अाहे.
 
तसेच नागरिकांना मळमळ उलट्यांचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका वायुगळतीमुळे तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात अाहे. गुरुवारी रात्री प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी खेडी, अयाेध्यानगरासह एमअायडीसी परिसरात पाहणी केली. 
 
गेल्या अाठ दिवसापासून मृत जनावरांचा तसेच सडलेल्या अंड्याचा वासासारखा दुर्गंधीयुक्त वास खेडी, कालिंकामाता मंदिर परिसर, अयाेध्यानगरात येत हाेता. बुधवारी हा वास अाणखी तीव्र झाला. तर गुरुवारी त्यात प्रचंड भर पडली हाेती. कमी अधिक प्रमाणात वासाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांना घराचे खिडक्या दरवाजे बंद करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना ताेंडाला रूमाल बांधून प्रवास करावा लागत अाहे. 
 
नागरिकांच्या तक्रारीत वाढ 
गेल्यादाेन दिवसात तक्रारी अधिक वाढल्याने कालिंकामाता मंदिर परिसरातील नगरसेविका ममता संजय काेल्हे यांनी पालिकेच्या अाराेग्य पर्यावरण विभागाकडे तक्रार करून माहिती कळवली. तसेच दिनकरनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या रूपाली वाघ, भगतसिंग वेद यांनी तक्रारी केल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. 
 
कंपनींचे खराब रसायन नाल्यात 
एमअायडीसीमधील काही कंपन्या रात्रीच्या वेळी किंवा पाऊस सुरू झाला की खराब रसायन हे नाल्यात साेडतात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वास येत असल्याची माहिती नागरिकांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. 

अधिकाऱ्याची पाहणी
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अशाेक करे यांना नागरिकांनी दुर्गंधीयुक्त वासाबाबत माहिती कळवल्यानंतर क्षेत्रीय अधिकारी नितीन चाैधरी यांनी कालिंकामाता मंदिर परिसरात पाहणी केली. रात्री १०.३० वाजेपर्यंत दुर्गंधी काेेणत्या भागातून येत अाहे, याचा शाेध घेतला जात हाेता. काही नाल्यांमधून वाहनाऱ्या पाण्याचा हा वास असू शकताे, असाही अंदाज व्यक्त करण्यात अाला. 
 
आज पुन्हा तपासणी 
गुरूवारी रात्री खेडी येथील काही भागात विद्युत पुरवठा खंडीत असल्याने नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा रंग समजू शकला नाही. तसेच वासाची तीव्रता देखिल कमी झाली हाेती. त्यामुळे नमुने घेता अाले नसल्याने नेमका वास कशाचा हाेता हे स्पष्ट हाेऊ शकले नाही; परंतु शुक्रवारी सकाळी पुन्हा या भागात तपासणी करणार अाहे. - नितीन चाैधरी, क्षेत्रीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ 
बातम्या आणखी आहेत...