आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टरांनी तक्रारदारांना सन्मानाने खुर्चीवर बसवून ऐकून घेतले गाऱ्हाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित महिला लोकशाही दिनात आपली गाऱ्हाणी घेऊन आलेल्या तक्रारदारांना जिल्हाधिकारी यांनी आपल्या शेजारच्या खुर्चीवर सन्मानाने बसवत त्यांच्याकडून त्यांच्या गाऱ्हाणी, समस्या आस्थेवाइकपणे जाणून घेतल्या. शिवाय त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना महिलेच्या तक्रारीवर किती दिवसात कार्यवाही करणार, याची माहिती त्यांना देण्याच्या सूचनाही दिल्या. दिलेल्या कालावधीत तक्रारीचे निवारण न झाल्यास मला फोन करा. यासाठी पुन्हा कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, असे सांगून त्यांनी कार्यतत्परताही दाखवली.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या महिला लोकशाही दिनास मोठया प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. या सर्व महिलांना एकाचवेळी बैठक हॉलमध्ये बोलावून घेण्यात आले. तसेच एक-एक करत प्रत्येक महिलेस आपल्या शेजारच्या खुर्चीवर बसण्यास सांगून त्यांनी त्यांची गाऱ्हाणी समजून घेतली. या महिला लोकशाही दिनात २८ तक्रार अर्ज प्राप्त झाले. यापैकी २५ अर्ज जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, अर्ज उपविभागीय अधिकारी (फैजपूर) तर अर्ज शिक्षण अधिकारी (माध्यमिक) यांच्या विभागाशी संबंधित होता.

महिला लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी बऱ्याच तक्रारी या पतसंस्थांमधून ठेवी मिळत नसल्याच्या होत्या. यावर जिल्हा उपनिबंधक यांनी तातडीने कार्यवाही करुन महिलांना त्यांच्या ठेवी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या. तसेच तक्रारदार महिलेचा विषय ज्या विभागाशी संबंधित आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांस महिलेच्या तक्रारीवर किती दिवसात कार्यवाही करणार याची माहिती त्यांना देण्याच्या सूचनाही दिल्या. दिलेल्या कालावधीत आपल्या तक्रारीचे निवारण झाल्यास मला फोन करा, असे सांगण्यासही जिल्हाधिकारी विसरले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...