आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफीमुळे जळगाव महापालिकेचे विकासकामांचे पावणे चार कोटी रुपये परत जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर हजारो कोटींचा भार पडणार असल्यामुळे शासनाने विकासकामांसाठी महापालिकेला दिलेला परंतु अद्यापही खर्च झालेला निधी परत मागवला आहे. महापालिकेकडे अखर्चित किती निधी आहे याविषयी राज्य शासनाच्या वित्त विभागाने सविस्तर अहवाल पालिकेकडे मागवला आहे. यामुळे मेहरुणचा सौंदर्यीकरणाचे पावणे चार कोटी रुपये परत जाणार अाहेत.
 
कर्जमाफीसाठी शासनाने मुदतीत निधी खर्च करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.मेहरूण तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी दिलेला कोटी ७५ लाख रूपये अद्यापही अखर्चित आहेत.या निधीतून मेहरूण तलाव परिसरात डांबरीकरण करण्यात येणार आहे. हा निधी शहरातील इतर विकास कामांसाठी खर्च करण्याचा मनोदय होता. मात्र मे महिन्यातील शासन निर्णयानुसार पाणी पुरवठा,मलनि:सारण,अमृत सुवर्ण जयंती अभियानांतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय शहरात रस्त्यांची कामे करता येणार नाहीत. मार्च २०१६ रोजी मेहरूण तलाव परिसरात रस्ते करण्यासाठी निधी देण्यात आला होता. हा निधी अखर्चित राहिल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी वळता केला होता.

२३ मे रोजी हा निधी पुन्हा महानगरपालिकेला देण्यात आला आहे. अद्यापही हा निधी खर्च करण्यात आला नाही. ३१ मार्च २०१८ पर्यंत हा निधी खर्च करण्यास मुदत देण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे ३१ मार्च २०१७ पर्यंत मनपाच्या अखर्चित निधीबाबत शासनाच्या वित्त विभागाने माहिती मागवली आहे. असे महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार अाहे, हजारो कोटी रूपये कर्जमाफीसाठी शासनाला लागणार आहे.त्यासाठी शासनाने विविध योजनांच्या निधीला कात्री लावलेली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...