आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका फायनान्स कंपनीवर मेहरबान, सागरपार्कसाठी अाकारले फक्त हजार रुपये भाडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एकीकडे महापालिकेची अार्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय अाहे. त्यात स्व उत्पन्न वाढवण्यासाठी पदाधिकारी अधिकारी सातत्याने भाषण देत अाहेत; परंतु पालिकेच्या विभागांना त्याचे काहीही देणे घेणे नसल्याचा अनुभव येत अाहे. सागर पार्क या मैदानाचा व्यावसायिक वापरासाठी एका दिवसाला सुमारे ५० हजार भाडे असताना फायनान्स कंपनीवर प्रेम करणाऱ्या किरकोळ वसुली विभागाने केवळ हजार रुपये आकारणी करून मेहेरबानी दाखवली अाहे. 
 
श्रीराम सिटी युनियन फायनान्स कंपनीने दुचाकी फायनान्स प्रदर्शनासाठी सागर पार्क येथील जागेचा वापरासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली हाेती. त्यानुसार रितसर जागेची फी भरण्याची तयारी दाखवली. पालिकेच्या किरकोळ वसुली विभागाने संबंधितांना प्रदर्शनासाठी दाेन दिवसांकरिता हजार रुपयांची आकारणी करून परवानगी दिली. शनिवारी या प्रदर्शनाचा समारोप देखील झाला. त्यानंतर पालिकेच्या गलथान कारभारावर प्रकाश पडला अाहे. सागरपार्क या पालिकेच्या मालकीच्या मैदानाचा क्रीडा अथवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वापर करायचा असल्यास पालिकेने हजार रुपये फी आकारणी करण्याचा निर्णय घेतला अाहे. तर व्यावसायिक अथवा लग्न कार्यासाठी प्रतिदिन ५० हजार रुपयांची आकारणीचा ठराव केला अाहे. 
 
गेल्या तीन महिन्यांपूर्वीच यावर सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात अाल्याचे स्थायी समिती सदस्य पृथ्वीराज साेनवणे यांनी सांगितले. फायनान्स कंपनीने जागेचा वापर हा व्यावसायिक कारणासाठी केलेला असताना पालिकेने केवळ हजार रुपयांची आकारणी केल्याने पालिकेचे ९५ हजारांचे अार्थिक नुकसान झाल्याचा दावा सोनवणेंनी केला अाहे. एकीकडे पालिकेच्या सभांमध्ये स्व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नांची गरज व्यक्त हाेत असताना सर्रास डोळेझाक करण्यात येत असल्याने पालिकेच्या परिस्थितीत खरच सुधारणा कशी होईल? असा सवाल केला जात अाहे. 
 
अायुक्तांकडे तक्रार 
पालिकेच्या किरकोळ वसुली विभागाने कोणतीही खात्री करता प्रतिदिन अडीच हजारांप्रमाणे हजारांची आकारणी केली. वास्तविक हा सांस्कृतिक कार्यक्रम नसून व्यावसायिक वापर हाेता. त्यामुळे पालिकेचे अार्थिक नुकसान झाले अाहे. याबाबत भविष्यात काळजी घेतली जाणे गरजेचे अाहे. यासाठी अायुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार करणार अाहेे. 
- पृथ्वीराज साेनवणे, नगरसेवक, भाजप 
बातम्या आणखी आहेत...