आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैर निवडणूक: भाजपचा मनसेला पाठिंबा, काेल्हेंची बिनविराेध निवड!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेतील वर्षानुवर्ष असलेली खाविअाची स्थायी समितीतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपला मनसेची माेठी मदत झाली हाेती. या मदतीची परतफेड करण्याच्या हेतूने मनसेचा महापाैर म्हणून ललित काेल्हे यांना भाजपाने जाहीर पाठिंबा दिला अाहे. विकासाचा निधी वाटपाचा मुद्दा प्रामुख्याने मांडत भाजपला निर्णय प्रक्रियेत सहभागी करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी दाखवली अाहे. भाजप नेत्यांशी चर्चेनंतर रात्री उशीरा पाठिंबा दिल्याचे अामदार सुरेश भाेळे यांनी जाहीर केले. त्यामुळो कोल्हेंचा महापौरपदी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. 
 
महापाैर निवडीसाठी गुरुवारी विशेष सभा होणार अाहे. महापाैर निवड बिनविराेध हाेईल की नाही, यावरून खलबते सुरू हाेती. भाजपने उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय हालचालींना वेग अाला हाेता. साेमवारी दुपारी वाजता खाविअाच्या शिष्टमंडळाने अामदार सुरेश भाेळे चंदूलाल पटेल यांची भेट घेतली. या वेळी सुमारे तासभर चर्चा करण्यात अाली. शिष्टमंडळात खाविअाच्यावतीने माजी उपमहापाैर सुनील महाजन, माजी सभापती नितीन बरडे, श्यामकांत साेनवणे, महापाैरपदाचे उमेदवार ललित काेल्हे स्वत: उपस्थित हाेते. तर भाजपच्यावतीने दाेन्ही अामदारांसह गटनेते सुनील माळी, विशाल त्रिपाठी महेश जाेशी उपस्थित हाेते. सुरुवातीला सुनील महाजन ललित काेल्हे यांनी अामदार भाेळेंना बिनविराेध निवडणुकीसाठी प्रस्ताव दिला. मनपा निवडणुकीला १० महिने शिल्लक अाहेत. सर्व मिळून शहराच्या विकासाला हातभार लावावा. संघर्ष टाळून विकास साधला जाणे अपेक्षित असल्याचे सांगितले. अागामी काळात घेण्यात येणाऱ्या निर्णय प्रक्रियेत अामदार भाेळेंनाही सहभागी करून घेण्यात येईल, असेही सांगितले. खाविअाचे नेते सुरेश जैन यांच्या अादेशानुसार शिष्टमंडळाने अामदार भाेळेंची भेट घेतली. 

बैठकीनंतर बाेलताना अामदार भाेळे यांनी प्राथमिक चर्चा करण्यात अाल्याचे सांगितले. शहराचा विकास हा प्रमुख मुद्दा असून पालिकेच्या निधी वाटपात समानता राहील याची ग्वाही देण्याचा अाग्रह धरला. काेणी म्हणेल म्हणून विशिष्ट ठिकाणी निधी वळवला जाऊ नये, राजकारणापेक्षा विकासावर भर दिला जावा, अशी अपेक्षा असल्याचे भाेळेंनी स्पष्ट केले. भाजपला स्थायी समिती सभापती निवडीसाठी मनसेने मदत केली हाेती. अातादेखील मनसेचाच महापाैर राहणार असल्याचे अामदार भाेळेंनी अावर्जुन सांगितले. सायंकाळी भाजपच्या नगरसेवकांसह श्रेष्ठींसाेबत झालेल्या चर्चेनंतर विकासाच्या मुद्द्यावर काेल्हेंना पाठिंबा देत असल्याचे अामदार भाेळेंनी स्पष्ट केल. तसेच पालिकेत नियमाविरूध्द घडल्यास भाजप विराेध करेल असेही स्पष्ट केले. 
 
मार्ग माेकळा 
गेल्या काही दिवसांपासून काेल्हेंच्या बिनविराेधचा मार्ग माेकळा हाेईल की नाही याबाबत अनिश्चितता हाेती. साेमवारी दिवसभर यासंदर्भात राजकीय तर्कवितर्क सुरू हाेते. साेमवारी निर्णय झाल्यास भाजपतर्फे उमेदवारी दाखल हाेते की नाही याबाबत उत्सुकता हाेती; परंतु भाजपने जाहीर पाठिंबा दिल्यामुळे ललित काेल्हे यांचा बिनविराेध निवडीचा मार्ग माेकळा झाला अाहे. 
 
उपमहापाैर निवड; १३ राेजी विशेष सभा 
महापाैरपदाचे उमेदवार ललित काेल्हे यांनी उपमहापाैरपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेसाठी १३ सप्टेंबर राेजी सकाळी ११ वाजता विशेष सभेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. जिल्हाधिकारी हे अध्यक्षस्थानी असतील. उपमहापाैरपदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारपासून सुरू हाेत अाहे. ते ११ सप्टेंबर दरम्यान दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज घेता येणार अाहेत. तर याच कालावधीत दुपारी वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार अाहेत. खाविअाचे नेते रमेश जैन काेणाला संधी देतात याकडे लक्ष लागून अाहे. 
 
राेजी स्थायी सभा 
मनपास्थायी समितीची सभा सप्टेंबर राेजी सकाळी ११ वाजता सभापती वर्षा नारायण खडके यांच्या अध्यक्षतेखाली होणार अाहे. सभेत गाेलाणी मार्केटमधील गाळेधारकांकडून साफसफाईसाठी तीन महिन्याकरिता ११०० रूपयांची अाकारणी होत अाहे. या प्रक्रियेला कार्याेत्तर मंजुरी दिली जाणार अाहे. तसेच स्वयंचलित वाहतूक नियंणक देखभाल दुरूस्तीच्या निविदेवर निर्णय घेतला जाईल. 
बातम्या आणखी आहेत...