आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकाने असलेल्या सहा राज्यमार्गांची देखभाल करणे अशक्य; महापालिका ठाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यातील अवर्गीकृत राज्यमार्गावरील दारूच्या दुकानांचा मार्ग लवकरच माेकळा हाेण्याची शक्यता अाहे; परंतु जळगाव पालिकेने शासनाने सहा रस्ते अवर्गीकृत करण्याच्या निर्णयाला विराेध केला अाहे. त्यामुळे जाेपर्यंत त्या रस्त्यांची जबाबदारी महापालिका स्वीकारत नाही, ताेपर्यंत दारू दुकानांचे कुलूप उघडणे अवघड अाहे. रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती करणे अशक्य असल्याने महासभेत घेतलेल्या भूमिकेवर मनपा ठाम असल्याची माहिती महापाैर नितीन लढ्ढा यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.

राज्य राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत दारूची दुकाने किंवा परमिट रूमवर बंदी घालण्याचा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने दिला हाेता.

त्यानंतर शहरातील सुमारे ८५ दुकाने बंद झाली अाहेत. अाता राज्य राज्यमहामार्गाबाबत सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू अाहे. बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान शहरातून जाणारे महामार्ग अवर्गीकृत करण्यात अाले असतील तर त्यांना सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय लागू राहणार नाही, असे सूताेवाच मिळत अाहेत. त्यामुळे राज्यभरातील राज्यमार्ग राज्य महामार्गावरील परमिट रूम दारूची दुकाने उघडण्याचा मार्ग लवकरच सुकर हाेण्याची शक्यता अाहे; परंतु जळगाव शहरातून जाणाऱ्या सहा राज्यमार्ग राज्य महामार्गाचे अवर्गीकृत करण्याचा राज्य शासनाचा निर्णय महापालिकेने नाकारला हाेता.

दारूच्या दुकानांसाठी शासनाने तडकाफडकी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यशासनाच्या विराेधात जनतेत संताप व्यक्त करण्यात अाला हाेता. यासाठी अांदाेलनही उभारले हाेते. त्यानंतर मनपानेे अार्थिक परिस्थिती नसल्याने रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करणे शक्य नसल्याची भूमिका घेत जबाबदारी नाकारली हाेती. अाता पुन्हा या सहा रस्त्यांच्या अवर्गीकृत करण्याची चर्चा सुरू झाली अाहे. त्यामुळे पुन्हा जनअांदाेलनाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मनपा काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून अाहे.
बातम्या आणखी आहेत...