आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खगाेलप्रेमींनी लुटला चंद्र ग्रहणाचा अानंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - साेमवारी रात्री झालेल्या चंद्रग्रहण पाहण्याचा अानंद शहरातील खगाेलप्रेमींनी लुटला. 
खगाेलप्रेमी ग्रुपतर्फे खगाेल अभ्यासक अमाेघ जाेशी यांच्या निवासस्थानावरील गच्चीवर सामूहिकरीत्या हे ग्रहण पाहण्याचा उपक्रम राबवण्यात अाला. रात्री उशीरा हाेवूनही या खगोलीय घटनेचा आनंद घेण्यासाठी माेठ्या प्रमाणात लहान आणि मोठ्यांची उपस्थिती होती. या वेळी जळगाव खगोलप्रेमी ग्रुपचे इम्रान तडवी, चिन्मय बारुदवाले, यश कुळकर्णी, श्रेया चौरसिया आदी उपस्थित होते. ढगांची ये-जा सुरु असूनही चंद्र ग्रहणाचा अानंद लुटण्यात अाला. रात्री पुर्ण चंद्रग्रहण खगाेलप्रेमींनी पाहिले. तर चंद्र ग्रहणाच्या छबी देखील अनेकांनी अापल्या मोबाईलमध्ये या वेळी टिपल्या. 
 
बातम्या आणखी आहेत...