आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांना आजपासून मिळणार २०० रुपयांच्या नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जळगावातील बँका आणि पतसंस्थांना २०० रुपयांच्या नव्या नोटांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे धनत्रयाेदशीच्या दिवशी या नोटा जळगावकरांना मिळणार आहेत. 
 
गेल्या दीड महिन्यांपासून जळगावकरांना ५० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटांची प्रतीक्षा होती. मोठ्या शहरांमध्ये महिनाभरापूर्वीच या नोटा वितरीत झाल्या होत्या. शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेला सोमवारी २०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून अदा करण्यात आल्या. धनत्रयोदशीला कोऱ्या नोटांचे वितरण केले जाते. यापार्श्वभूमीवर स्टेट बँकेने शहरातील बँका आणि पतसंस्थांना या नोटांचे वितरण केले. त्यानुसार मंगळवारपासून जळगावकरांना बँकेतून २०० रुपयांची नवी नोट घेता येणार आहे. तसेच पंधरवाड्यात ५० रुपयांची नोटही येईल, असे स्टेट बँकेतर्फे सांगण्यात आले. 
 
एकतापतसंस्थेत मिळणार २०० च्या नोटा एकतारिटेल पतसंस्थेतर्फे मंगळवारी पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये सकाळी ११ ते सायंकाळी 4 या वेळेत २०० रुपयाच्या १० नोटा स्टॉक असेपर्यंत बदलवून मिळतील. यासाठी आधारकार्ड किंवा पॅन कॉर्ड आवश्यक आहे. महिलांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था आहे. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुळकर्णी यांच्या हस्ते उपक्रमास सुरुवात हाेईल, असे पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडिया यांनी कळवले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...