आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडपड आधार नोंदणीसाठी : जमावाकडून पालिकेतील मेटल डिटेक्टरची मोडतोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वर्षभरापासून बंद असलेल्या आधार नोंदणीला शहरातील दोन ठिकाणी सुरुवात झाली आहे. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या सुरू असलेल्या आधार नोंदणीसाठी कुपन मिळवण्यासाठी शुक्रवारी प्रचंड गर्दी उसळली होती. कुपन मिळवण्यासाठी झालेल्या चढाओढीत जमावाकडून पालिकेच्या प्रवेशद्वारातील मेटल डिटेक्टरची मोडतोड करण्यात आली. जमावाला आवरणे सुरक्षारक्षकांना शक्य नसल्याने पोलिस बंदोबस्त मागवावा लागला.

पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील सहव्या मजल्यावर आधार नोंदणीचे काम सुरू झाले आहे. दर दिवसाला होणारी गर्दी टाळण्यासाठी शुक्रवारी कुपन वाटप करण्याचे जाहीर करण्यात आल्याने सकाळी सात वाजेपासून नागरिकांनी पालिकेच्या प्रांगणात रांगा लागल्या होत्या. कुपनची रांग वाढत थेट भगवती स्वीटपर्यंत लांब गेल्याने बराच गोंधळ झाला. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांकडून जमावावर नियंत्रण मिळवता न आल्याने पोलिस बंदोबस्त मागवण्याची वेळ आली. अशा परिस्थितीतही रांगा मोडून नागरिक पालिकेच्या इमारतीत घुसल्याने झालेल्या धावपळीमुळे प्रवेशद्वारातील मेटल डिटेक्टरची मोडतोड झाली. पोलिस व सुरक्षा रक्षकांनी जमावाला नियंत्रणात आणत 3 मार्चपर्यंतचे कुपन वितरित करण्यात आले.

मक्तेदाराचा समन्वयक गैरहजर
आधार नोंदणीसाठीचे फॉर्म तपासणी करण्यासाठी समन्वयक कार्यरत ठेवण्यात आला आहे. मात्र समन्वयक या ठिकाणी आढळून येत नाही. त्यामुळे तीन-चार तास रांगेत उभे राहून नंबर लागल्यावर ऐन नोंदणीच्या वेळी त्रुटींमुळे किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे नागरिकांना बाहेर निघावे लागते.