आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भादली हत्याकांड; सात जणांची नार्को टेस्टसाठी इनकॅमेरा चौकशी,साक्षीदारांना टेस्टबाबत दिली संपूर्ण माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: भादली हत्याकांडास दीड महिना उलटूनही संशयितांचा शोध लागल्याने पोलिसांनी जणांची ‘नार्काे टेस्ट’ करण्याची मागणी न्यायालयात केली होती. त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गाेरे यांनी सोमवारी नार्काे टेस्ट करण्यास परवानगी दिली. त्या सातही जणांना मंगळवारी न्यायदान कक्षात २३ मिनिटे इनकॅमेरा चाैकशी होऊन त्यांनी नार्काे टेस्ट करण्यासाठी हाेकार दिला अाहे. 
 
भादली येथील प्रदीप सुरेश भोळे (वय ४५), पत्नी संगीता प्रदीप भोळे (वय ३५), मुलगी दिव्या प्रदीप भोळे (वय ८), तर मुलगा चेतन प्रदीप भोळे (वय ५) यांची २० मार्च राेजी निर्घृण हत्या करण्यात अाली हाेती. मात्र, या घटनेला दीड महिना उलटला तरी संशयित हत्यारे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी पथके स्थापन करून तपासासाठी पाठवले होते. तसेच जवळचे नातेवाईक, ग्रामस्थ, मित्रमंडळी मिळून ६३ जणांचे जबाब घेतले अाहेत. त्यामुळे त्यांची पॉलिग्राफ, ब्रेन मॅपिंग, नार्काे टेस्ट करण्याची मागणी पोलिसांतर्फे करण्यात अाली हाेती. त्याला साेमवारी न्यायाधीश गाेरे यांनी परवानगी दिली. 
 
साक्षीदारांची संमतीपत्रावर स्वाक्षरी 
‘नार्काे टेस्ट’ करण्यापूर्वी साक्षीदारांना या टेस्टबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यात काय केले जाते, काेणत्या ठिकाणी ही टेस्ट हाेते. तसेच पोलिसांच्या जबाबाप्रमाणेच या चाचणीचाही जबाब असताे. हे सर्व समजावून सांगितल्यानंतर साक्षीदारांनी न्यायाधीशांना होकार दिला. दुपारी वाजेनंतर सातही जणांच्या संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात अाल्या. 
 
...यांची झाली चाैकशी 
भादली हत्याकांडातील फिर्यादी अलका दिनकर भाेळे, साक्षीदार दिनकर लक्ष्मण भाेळे, पंकज दिनकर भाेळे, ईश्वर छगन भाेळे, दीपक मदन खडसे, देविदास गाेबा काेळी, रमेश बाबुराव भाेळे यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग अाणि पॉलिग्राफ या तपासण्या करण्याची मागणी सरकारतर्फे अॅड. स्वाती निकम यांनी केली हाेती. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर मंगळवारी या सातही जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. मंगळवारी दुपारी वाजता इन कॅमेरा प्रत्येक साक्षीदाराच्या चौकशीला सुरुवात झाली. या वेळी न्यायाधीश गाेरे, साक्षीदार तसेच दाेन्ही पक्षांचे वकील नशिराबाद पाेलिस ठाण्याचे सहायक पाेलिस निरीक्षक राहुल वाघ, वासुदेव मराठे उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...