आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मनात दु:ख अन् चेहर्‍यावर हसू, आमच्यासारखे आयुष्य कुणालाही मिळू नये'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तृतीयपंथीयाचे आयुष्य मिळाल्यामुळे समाजाकडून जो अपमान केला जातो, तसा इतरांना कधीही मिळू नये. तसेच आमच्यासारखे आयुष्यही कुणाला मिळू नये, अशा हृदयस्पर्शी भावना तृतीयपंथीयांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केल्या. निमित्त होते भोसराज मातेच्या उपवासांच्या समारोपानिमित्त आयोजित जलशाचे!

तब्बल 40 दिवसांचे उपवास करून जळगावातील दीपिका जान या तृतीयपंथीयाने भोसराज मातेची आराधना केली. शुक्रवारी या उपवासांची सांगता हरिविठ्ठलनगर भागात ‘जलसा’ कार्यक्रमाने करण्यात आली. या वेळी नागपूर, सुरत, इंदूर, रायपूर, जबलपूर आदी ठिकाणांहून सुमारे 250 तृतीयपंथीय एकत्र आले होते. त्यात उत्तम बाबा, संजना शहा, तन्नू जान, चमचम जान, खुशी जान, चांदणी जान, सलोनी जान, तमन्ना जान यांची विशेष उपस्थिती होती.


दिवसभर कार्यक्रम
जळगावच्या दीपिका जानने भोसराज मातेचे 40 दिवसांचे उपवास केले. सांगतेवेळी दुपारी 12 वाजता दूध व पंचामृताने भरलेला कलश विहिरीत बुडवून प्रार्थना करण्यात आली. या वेळी उपस्थित तृतीयपंथीयांनी दीपिका जानचा नवीन वस्त्रे देऊन सन्मान केला.