आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon BJP Collect Uttarkhand Fund To Candidates

भाजपच्या मदतीची ‘उत्तराखंड’ला प्रतीक्षा; प्रत्येकाकडून गोळा केली फी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज देताना भाजपने आकारलेली फीची रक्कम गोळा होऊन महिना उलटला आहे. पक्षाने जाहीर केल्याप्रमाणे जमलेली रक्कम नियोजनानुसार सार्थकी लागलेली नसून, ‘उत्तराखंड’ आजही भारतीय जनता पक्षाकडून मिळणार्‍या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.

महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज उपलब्ध करून दिले होते. त्यासाठी काही रक्कमही घेतली होती. भारतीय जनता पक्षाने जनरल जागेसाठी 1100 रुपये, महिलांसाठी 700 व अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी 500 रुपये फी आकारली होती. यासंदर्भात भाजपचा उमेदवारी अर्ज सगळ्यात महागडा असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले होते. त्या वेळी पदाधिकार्‍यांनी गोळा होणारा पैसा उत्तराखंडातील नुकसानग्रस्तांना दिला जाईल, असे जाहीर केले होते. भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून सुमारे 384 जणांनी अर्ज नेले होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काही लोकांनी पैसे दिले नाही. तथापि, अर्जाच्या बदल्यात पक्षाकडे सुमारे दीड लाखाहून अधिक रक्कम गोळा झाली होती; परंतु महिना उलटूनही पक्षाकडून दिली जाणारी ही मदत उत्तराखंडपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. धनादेशाद्वारेदेखील ही रक्कम पोहोचवली गेली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे भाजपकडून या मदतनिधीचे काय झाले? खरेच मदत दिली जाणार की ती पोकळ घोषणा होती? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

हिशोब मागितला
निलंबनाची कारवाई झालेले महानगर चिटणीस नितीन गायकवाड यांच्याकडे निवडणुकीसंदर्भातील व्यवहाराचा हिशोब होता. त्यांच्याकडून अद्याप हिशोब आलेला नसून, तो आल्यानंतर मदत पाठवणार आहे.
-उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप

अन्य रक्कम भोळेंकडे दिली
उमेदवारीसाठी सुमारे 160 अर्ज नेण्यात आले होते; मात्र त्यापैकी केवळ 25 टक्के लोकांनी पैसे दिले. त्यात इतर पक्षांचे कार्यकर्ते होते. जमलेल्या पैशांपैकी 75 टक्के रकमेचा हिशोब सुरेश भोळेंकडे दिला आहे. उर्वरित हिशोब जिल्हाध्यक्षांकांकडे लवकरच देणार.
-नितीन गायकवाड