आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावातील तरुणाने रोवला सातासमुद्रापार झेंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील निमिष पाटील या 24वर्षीय तरुणाने सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. तो अमेरिकेतील रूटजर्स विद्यापीठा (न्यू जर्सी)त ‘एमएस इन केमिकल अ‍ॅण्ड बायोकेमिकल इंजिनिअरिंगमध्ये 97.5 टक्के मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. भारतीय मुले परदेशी मुलांपेक्षा जास्त हुशार असतात, हे निमिषने सिद्ध करून दाखवले आहे. अनेकदा आपल्याला इंग्रजी जमेल का? तिथल्या वातावरणात आपण राहू शकू का? अशा अनेक प्रश्नांमुळे विद्यार्थी परदेशात जायला नकार देतात. मात्र, परदेशात शिक्षणासाठी जायचे असल्यास कोणताही न्यूनगंड वा भीती न बाळगता बिनधास्तपणे जावे. समोर ध्येय ठेवून अभ्यास केल्यास भारतीयांनाही तिथला अभ्यासक्रम सोपा ठरतो, असे मत निमिष पाटील याने ‘दिव्य मराठी’जवळ व्यक्त केले.

निमिष हा ‘व्हेगा केमिकल्स’चे सीईओ व जळगाव पीपल्स बॅँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांचा मुलगा आहे. नुकत्याच झालेल्या पदवीदान समारंभात त्याला गौरवले.
अभ्यासाबरोबर कामही
सधन कुटुंबातील निमिषने परदेशात पार्टटाइम जॉबही केला. तेथे शिक्षणापेक्षा राहण्याचा आणि जेवणाचाच खर्च जास्त असतो. आठवड्यातील तीन दिवस कॉलेज झाल्यानंतर चार दिवस महाविद्यालयातील प्राध्यापिकेसोबत नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन केले. तसेच प्रॅक्टिकल ज्ञान घेतले व उरलेला वेळ डायनिंग हॉलमध्ये काम केले. दर आठवड्याला 120 डॉलर तो कमवायचा. त्यातून खर्च खूप कमी व्हायचा.
वडिलांकडून मिळाली दिशा
शहरातील सेंट जोसेफ शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्याने मुंबईतील ठाकूर कॉलेजमध्ये बारावी व नंतर आयसीटी महाविद्यालयातून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर काय करावे? याबाबत तो गोंधळला होता. तथापि, वडील आणि काका यांच्या मदतीने त्याने परदेशात एमएस करायचे ठरवले.
दुखापतींवर मिळवले यश
दोन वर्षांत 10 विषयांचा अभ्यास करायचा असतो. त्यासाठी तेथे दोन वर्षे राहावे लागते. निमिष सप्टेंबर 2012मध्ये अमेरिकेत गेला; परंतु त्याला पाठीचे दुखणे होते. खूप त्रास होऊ लागल्याने डिसेंबर 2012ला तो परत आला. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायला लावली व त्यानंतर 3 महिने आराम करायला लावला. भारतात 8 महिने राहिल्यानंतर जोमाने तो जून 2013मध्ये परत गेला व अभ्यासाला सुरुवात केली. इतरांप्रमाणेच त्याने अभ्यास केला. बुडलेला अभ्यासक्रम मेहनत घेऊन परत शिकला आणि यश मिळवले.
कडक शिस्तीत अभ्यास होतो
तेथे खूप शिस्तबद्ध कारभार आहे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. दर आठवड्याला होमवर्क दिला जातो; तो करावाच लागतो. त्याचे गुण अंतिम परीक्षेत जोडले जातात. कोणी इतरांचे नोट्स घेऊन अभ्यास करायचा प्रयत्न केल्यास शिक्षा केली जाते. अभ्यासक्रमाची बांधणीही खूप चांगली असल्याने अभ्यास आपोआप होत राहतो; तो करावा लागत नाही. प्राध्यापकही नेहमी उपलब्ध असतात. अडचणी विचारताच ते मेल करतात. शिक्षणपद्धतीची मांडणी चांगली असून, तेथील अभ्यासक्रम भारतीय शिक्षणापेक्षा सोपा वाटतो. शिस्त असल्याने शिक्षणाचे महत्त्व खूप वाढते. सध्या घरच्या फॅक्टरीत वडिलांच्या हाताखाली मार्गदर्शन घेत अनुभव घेणार आहे.
- निमिष पाटील