आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Central Cooperative Bank News In Marathi, Difference Cutting, Divya Marathi

फरक कपातप्रकरणी जिल्हा मध्‍यवर्ती बँकेला नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या कर्मचार्‍यांना पगारवाढ करून दिल्यानंतर वाढ झालेल्या रकमेतून एका महिन्याचा फरक कापण्यात आला होता. याप्रकरणी संस्थेचे कर्मचारी किरण खडके यांनी सहायक कामगार आयुक्तांकडे धाव घेतली होती. याबाबत तक्रारदार आणि बॅँकेला म्हणणे सादर करण्यासाठी शुक्रवारी उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बॅँक कर्मचार्‍यांच्या पगारवाढीच्या रकमेतून युनियन फंडापोटी एका महिन्याचा फरक कपात करण्यात आला आहे. कर्मचार्‍यांचे तब्बल 40 लाख रुपये एवढी मोठी रक्कम कपात करण्यात आली आहे. याप्रकरणी बॅँकेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती शाखेचे लिपिक किरण खडके यांनी सहकार विभागासह सहायक कामगार आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. त्यात कर्मचार्‍यांच्या परवानगीशिवाय व कोणतीही पूर्वकल्पना न देता बॅँकेने परिपत्रक काढून युनियन फंडाच्या नावे पैसे कपात केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी सहायक कामगार आयुक्तांनी जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आणि तक्रारदाराच्या नावे नोटीस काढली आहे. दोघांनीही पुराव्यांसह आपले म्हणणे सादर करण्यासाठी 11 एप्रिल रोजी उपस्थित राहावे, असे नोटिशीत म्हटले आहे.