आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव-शहरातील दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेला अट्टल दराेडेखाेर जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अट्टल दरोडेखोर राहुल सोनवणे याला अटक करून न्यायालयात घेऊन जाताना रामानंद नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी. - Divya Marathi
अट्टल दरोडेखोर राहुल सोनवणे याला अटक करून न्यायालयात घेऊन जाताना रामानंद नगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी.
जळगाव- शहरात दराेडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या अट्टल दराेडेखाेर राहुल संदीप साेनवणे याला रामानंदनगर पाेलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ११ वाजता पिंप्राळ्यातील अादर्श हाॅटेल परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा अाणि जिवंत काडतूस पाेलिसांनी जप्त केले अाहे. राज्यात अनेक ठिकाणी दराेडे, घरफाेड्या करणाऱ्या ‘माेस्ट वाँटेड’ दराेडेखाेरावर दाेन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यासह राज्यभरात चार ठिकाणी दराेड्याचे गुन्हे दाखल अाहेत. त्याला शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी के.एस.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन काेठडी सुनावली अाहे. 
 
पिंप्राळा परिसरातील अादर्श हाॅटेलच्या मागच्या बाजूला एक संशयित तरुण फिरत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांना मिळाली हाेती. त्यांनी याविषयी रामानंदनगर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांना माहिती दिली. त्यानंतर वाडिले यांनी गाेपाल चाैधरी, प्रदीप चाैधरी, शरद पाटील, विजय खैरे, विलास शिंदे, सुरेश मेढे, अतुल पवार, ज्ञानेश्वर काेळी या पाेलिस कर्मचाऱ्याचे पथक तयार करून त्यांना शुक्रवारी रात्री १०. ४० वाजेच्या सुमारास अादर्श हाॅटेलच्या मागच्या बाजूला पाठवले. त्या ठिकाणी रात्री ११ वाजता एक तरुण संशयितरीत्या फिरत हाेता. पाेलिस पथकाने त्याला हटकले असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी काही अंतरापर्यंत पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता. त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा अाणि एक जिवंत काडतूस सापडले. राहुल संदीप साेनवणे (वय २६, रा. अरिंगळे मळा, एकलहरा रस्ता, सिन्नर नाका, नाशिक) असे संशयिताचे नाव अाहे. त्याची चाैकशी केली असता ताे अट्टल दराेडेखाेर असल्याचे निष्पन्न झाले. त्याने त्याच्या साथीदारांसह मे राेजी रात्री संगमनेर-अहमदनगर रस्त्यावरील पेट्राेलपंपावर दराेडा टाकला. त्यात बंदुकीचा धाक दाखवून पेट्राेलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या हातातून लाख रुपये असलेली बॅग घेऊन पसार झाले हाेते. तर २८ फेब्रुवारी राेजी वैजापूर येथील अजिंठा वाइन शाॅप या दुकानातील कर्मचारी रात्री ११ वाजता दुकान बंद करून मालकाकडे दिवसभराचा हिशेब देण्यासाठी जाणार हाेते. त्या वेळी तिघांनी दुचाकीवर येऊन बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्याच्या हातातील बॅग हिसकावून नेली हाेती. बॅगेत साडेतीन लाख रुपये हाेते. या गुन्ह्यात राहुलने नेरीनाका चाैकातून फेब्रुवारी महिन्यात चाेरली गेलेली दुचाकी वापरल्याची कबुली दिली अाहे. तर पूर्वी त्याच्यावर चाेपडा अाणि अकाेला येथेही दराेड्याचे गुन्हे दाखल अाहेत. तर नाशिक येथे घरफाेडीचे १४ गुन्हे दाखल अाहेत. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ठिकाणी अार्म अॅक्ट दाखल असून त्याच्याकडून अातापर्यंत गावठी कट्टे पाेलिसांनी जप्त केलेले अाहेत. शुक्रवारी रात्रीही ताे त्याच्या साथीदारांसह जळगाव शहरात किंवा अाजूबाजूला दराेडा टाकण्याच्या तयारीत हाेता. त्यादृष्टीने त्याने संपूर्ण नियोजन आखले होते. परंतु पोलिसांना या नियोजनाची माहिती मिळाल्याने दराेडेखाेर राहुल साेनवणे याचा सर्व प्लॅन फेल झाला. या विषयी खुद्द दराेडेखाेर राहुल साेनवणे याने पोलिस चौकशी दरम्यान कबुली दिली अाहे. 
 
चाेऱ्या करून गुन्हेगारांना अाश्रय 
1) राज्यभरात चाेऱ्या केल्यानंतर चाेरटे अाश्रयासाठी राहुल साेनवणे याच्याकडे जात हाेते. त्याने नाशिकराेडला फ्लॅट भाड्याने घेतला हाेता. त्यात या चाेरट्यांना ताे अाश्रय देत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली अाहे. त्याची अाेळख परेडसाठी संगमनेर वैजापूर पाेलिस शनिवारी शहरात येऊन गेले. 
2) अट्टल घरफोड्या साेपराजा अाणि त्याच्या साथीदारांनी जळगाव शहरात घरफाेड्या केल्यानंतर ते चाेरलेल्या मोटारसायकलने नाशिक येथे अाश्रयास येत येत होते. काही दिवस थांबल्यानंतर पुन्हा ते रवाना होत होते, अशी कबुली राहुल याने रामानंदनगर पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत दिली अाहे. 
 
 
जळगावातील घरफोड्या साेपराजा साेबतही केले गुन्हे 
रामानंदनगर पाेलिसांनी २९ एप्रिल राेजी अट्टल घरफोड्या राजेंद्र ऊर्फ साेपराजा दत्तात्रय गुरव (वय २८, रा. अासाेदा राेड) याच्या मुसक्या अावळल्या हाेत्या. सध्या ताे पाेलिस काेठडीत अाहे. राहुलने विविध जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या अनेक टाेळ्या बनवल्या अाहेत. यात साेपराजा तसेच जिल्ह्यातील अाणखी काही गुन्हेगारही त्याच्या टाेळीत असल्याचा पाेलिसांना संशय अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...