आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएमटीयू बसचा तिढा तात्पुरता सुटला, रिक्षाचे भाडे ‘जैसे थे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आठवडा भरापासूनमहापालिकेची जेएमटीयू बससेवा बंद झाल्यामुळे जळगावकरांचे प्रचंड हाल होत आहे. मंगळवारी महापालिका प्रशासनाने मक्तेदाराच्या मागणीनुसार महिनाभरासाठी ख्वाजामियांॅ चौकातील शाॅपिंग कॉम्प्लेक्सची आरक्षित जागा वाहनतळासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, आता मक्तेदार पुन्हा बससेवा सुरू करतो की नाही, याबाबत संभ्रम चौण झालेला आहे.
तीन वर्षांपासून शहरात वाहतूक सेवा पुरवणाऱ्या साई िसटी सर्व्हिसेसने महापालिकेकडे वारंवार वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात बऱ्याचदा पत्रव्यवहार होऊनही जागेचा तिढा सुटू शकला नव्हता. त्यामुळे आठवडाभरापासून मक्तेदाराने जेएमटीयू बससेवा बंद केली आहे. सोमवारी परिवहन सभापती प्रमोद झंवर यांनी सभापतीसाठी असलेले दालन वाहन नाकारले होते. तसेच नागरिकांनी ही समस्या उचलून धरली. यांची दखल घेऊन मंगळवारी जिल्‍हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त रुबल अग्रवाल यांनी तातडीने लक्ष घालून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांना आजच्या आज व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर प्रशासनाने मक्तेदाराच्या बसेस उभ्या करण्यासाठी ख्वाजामियांॅ चौकातील मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, साई सीटी सर्व्हिसेसचे संचालक सुनील झंवर यांना शहरात बससेवा केव्हा सुरू करणार, याबाबत माहिती जाणून घेण्यासठी ‘दिव्‍य मराठी’ने त्यांच्या भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क केला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही.
करणे शक्य होणार आहे.
मनपाची शहर बससेवा ही खासगी ठेकेदार प्रशासन यांच्या वादामुळे अनेकदा बंद करून पुन्हा सुरू करण्याचे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. त्यामुळे महामंडळाच्या शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय आम्हाला घेता येत नाही. ठोस निर्णय झाल्यास त्यावर महामंडळाकडून शहरात बससेवा सुरू करण्याविषयी निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी बसस्थानकाची जागा उपलब्ध असून बसेस मनुष्यबळही उपलब्ध करून दिले जाईल.
करारातील अटींचे काय?
साईिसटी सर्व्हिसेसने महापालिकेसोबत करार करताना शहरात बससेवा पुरवण्यासाठी १० वर्षांचा करार केला होता. करारातील अटीनुसार पालिकेने वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मक्तेदाराची मागणी होती. ती पूर्ण करून देण्यास विलंब केल्याने सेवा बंद केली होती. आता पालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मक्तेदाराने सेवा सुरू करणे प्रशासनाला अपेक्षित आहे. सेवा सुरू केल्यास अटींचा भंग होतो का? तसेच अटी- शर्तीं भंग झाल्यास प्रशासन काय भूमिका घेते, याकडेही लक्ष लागून आहे.