आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगचा ठपका ठेवत जेएमटीयूला अखेर ‘ब्रेक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तीनवर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत महापालिकेने सुरू केलेली गेल्या काही महिन्यांपासून आॅक्सिजनवर असलेली जेएमटीयू अर्थात पालिकेची बससेवा गेल्या आठवडाभरापासून बंद करण्यात आली आहे. पार्किंगची सोय करून देण्याची मागणी महापालिका प्रशासन पूर्ण करू शकल्याने मक्तेदाराला अखेर बस बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थी, कामगार सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन नवनियुक्त आमदार सुरेश भोळे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावून जळगावकरांना दिला देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नोव्हेंबर २०११मध्ये पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी ‘साई सिटी बस सर्व्हिसेस’ या कंपनीला बससेवा पुरवण्याचा मक्ता दिला होता. सुरुवातीला २५ बसेसनी सुरुवात झालेल्या या सेवेला कालांतराने उतरती कळा लागली. २५नंतर १५, १० आता गेल्या काही महिन्यांपासून केवळ बसेसच्या सुमारे ४५ ते ५० फेऱ्या सुरू होत्या. या पाच बसेसचा मुख्यत्वाने उमवि पाळधीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी वापर होत असे. मात्र, मक्तेदाराने नोव्हेंबरला पालिकेला पत्र देऊन बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्रानंतरसुरू झाल्या हालचाली
जळगावशहरातील नागरिकांना साध्या मुलभूत सुिवधाही देणाऱ्या पालिका प्रशासनाचे अपयश दिवसेंदिवस उघड होवू लागले आहे. आधीच कोणीही बससेवा पुरवायला तयार नसताना साई सर्व्हीसेसला तयार करण्यात आले होते. परंतु रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या बसेस, दुकानदारांचा त्रास, वाहतुक शाखेकडून होणारा पत्रव्यवहार यामुळे मक्तेदाराने अनेकदा पालिकेला पत्रव्यवहार केला. बसेस पार्कीगसाठी जागा देण्याची मागणी होत होती. परंतु प्रशासन मूग िगळून गप्प होते. अखेर सोमवारी पत्र हाती येताच बैठकांचे आयोजन करण्यात आले.

मक्तेदाराने बससेवा बंद करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. आयुक्त तथा जिल्‍हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर चर्चा करून तोडगा काढला जाईल. सोमवारी सायंकाळी बैठक बोलावण्यात आली होती, परंतु बैठक होऊ शकली नाही. पार्किंग करण्यासाठी जागा मिळावी, अशी मक्तेदाराची मागणी आहे. बससेवा सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अविनाश गांगोडे, उपायुक्त,महापालिका