आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेट खेळण्यावरून वाद; दोघांनी फोडल्या दुकानाच्या काचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव:  रस्त्यावर क्रिकेट खेळत असताना मालवाहू गाडी पार्क केल्यावरून बळीरामपेठेत शनिवारी दुपारी काही युवकांचा व्यापाऱ्याशी वाद झाला. यातील दोघांनी संताप व्यक्त करण्यासाठी दारू पिऊन रात्री दुकानावर दगडफेक करून काचा फोडल्या. या घटनेत दुकानाचे आठ हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी रविवारी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्विन भोळे (वय ३२), बिपीन पवार (वय ३०, दोन्ही रा. बळीरामपेठ) यांनी रात्री दारू पिऊन धिंगाणा घालत दुकानावर दगडफेक करून काचा फोडल्या. हा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. 
बातम्या आणखी आहेत...