आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पालिका कर्जमुक्त होणार; विकासाचा मार्ग खुलणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहराचं रुप बदलवण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी आणि प्रशासन प्रयत्नशील झाले आहे. महापालिकेला कर्जमुक्त करण्याचा आग्रह घोतक मानले जात आहे.
महापालिकेच्या कर्जाचा डोंगर कमी करून कर्जमुक्तीसाठी आता राज्य शासन राजकीय पातळीवर जोरदार हालचालींना वेग आला आहे. हुडकोशी एकरकमी परतफेडीची बोलणी सुरू झाली आहे. राज्य, हुडको पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटादेखील सुरू झाला असून एकरकमी परतफेडीसाठी पालिकेने १८ कोटी ५१ लाखांचा फेरप्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्यावर सकारात्मक विचार होणार आहे.
हुडकोसोबत सुरू असलेली बोलणी यशस्वी झाल्यानंतर पालिका खऱ्या अर्थाने कर्जमुक्तीकडे वाटचाल करणार आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत पालिका कर्जमुक्त होऊ शकते. त्यामुळे शहरात पुन्हा विकासाचा मार्ग सुकर होऊन विकासाची गंगा वाहणार आहे.
काय होईल विकास
कर्जमुक्तीमुळे पालिकेच्या फंडात जमा होणारा पैसा हा शहरातील विकासासाठी अर्थात रस्ते, गटारी, पाइपलाइन, साफसफाई या मूलभूत सुविधांसाठी वापरता येईल. त्याचबरोबर शासनाकडे पडून असलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळून पालिकेचा हिस्सा भरल्याने मोठ्या योजनांची मुहूर्तमेढ रोवली जाईल.