आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील वर्दळीचे रस्ते घेतील मोकळा श्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. नागरिकांच्या वाढत्या तक्रारी पाहता पालिका प्रशासनाने पाेलिस बंदाेबस्तात पिवळ्या पट्ट्यांच्या बाहेर येऊन व्यवसाय करणार्‍यांना हटवण्याची माेहीम सुरू केली आहे. यामुळे वर्दळीचे रस्ते काही काळासाठी माेकळे झाले आहेत.

अतिक्रमण विभागातर्फे शुक्रवारी नेहरू चाैकापासून माेहिमेला सुरुवात झाली. पालिकेच्या अतिक्रमण पथकातील कर्मचार्‍यांसह तीन पाेलिस कर्मचारी बंदाेेबस्तासाठी हाेते. या पथकाने भिलपुरा चाैकापर्यंत रस्त्याच्या दाेन्ही बाजूला असलेल्या विक्रेत्यांना मागे हटवून बसण्यास सांगितले. यानंतर चाैबेे शाळा ते सुभाष चाैकापर्यंत विक्रेत्यांनाही तशाच सूचना देण्यात आल्या. यासह शहरातील इतर रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करणार्‍यांनाही पहिल्या दिवशी सूचना देण्यात आल्या. शास्त्री टाॅवर, भिलपुरा चाैकी, सुभाष चाैक भागात दिवसभरात दाेन-तीनवेळा अतिक्रमण विभागाचे पथक फिरल्याने सायंकाळी ते वाजेपर्यंत विक्रेते मागे सरकून बसले हाेते. मात्र, सायंकाळनंतर काही विक्रेत्यांनी रस्त्यात हातगाड्या लावून विक्री सुरू केली हाेती. पालिकेचे पथक जाताच काहीजण रस्त्यावर येऊन व्यवसाय करत असल्याचे चित्र सायंकाळी नजरेस पडले.

जप्तीची कारवाई करणार
शहराती लसुभाष चाैक, चाैबे शाळाचाैक, महापालिका ते भिलपुरा पाेलिस चाैकीसह शहरातील इतर वर्दळीच्या रस्त्यांवर पट्ट्यांच्या बाहेर व्यवसाय करणार्‍यांना मागे हटवण्याची माेहीम हाती घेतली आहे. यासाठी पाेलिस बंदाेबस्तदेखील मिळाला आहे. शुक्रवारी विक्रेत्यांना सूचना दिल्यावर विक्रेते मागे हटले आहेत. या माेहिमेत सातत्य ठेवले जाणार असून रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍यांचे साहित्य जप्त करण्यात येईल. इस्माईलशेख, अतिक्रमण विभाग प्रमुख

फिरते विक्रेते मुख्य डाेकेदुखी
हातगाडीवरमाल ठेवून फिरती विक्री करणार्‍या विक्रेत्यांमुळेच रहदारीची काेंडी हाेते. यात काही फळविक्रेते आणि भाजीपाला विक्रेत्यांचाही समावेश आहे. प्राथमिक सूचना देऊनही जुमानणार्‍यांचे अतिक्रमण विभागातर्फे साहित्य जप्त करण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी वाद घालू नये, यासाठी पाेलिस बंदाेबस्त अजून काही दिवस पालिकेच्या पथकासाेबत राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...