आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon City Health News In Marathi, Jalgaon Municipal Corporation, Divya Marathi

दिव्य मराठी सर्वेक्षण: होय, शहराच्या आरोग्याचा प्रश्न गंभीरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कचरा उचलण्यासाठी चिमुरडेही - Divya Marathi
कचरा उचलण्यासाठी चिमुरडेही

प्रशासनाचा जळगावकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची ओरड नगरसेवकांकडून होत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेबाबत मंगळवारी ‘दिव्य मराठी’ने केलेल्या सर्वेक्षणात भयावह स्थिती समोर आली आहे. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत स्वच्छतेचे काम दृष्टीस पडते. त्यातही मक्तेदाराच्या यंत्रणेवरच जास्त मदार आहे. कमी मनुष्यबळाकडून अधिक व गुणवत्तापूर्ण कामाची प्रशासनाची अपेक्षा आहे; परंतु मंजूर असलेली 585 पदे आजही रिक्त असून, ती भरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.


असे होते शहरात स्वच्छतेचे चित्र
† दूध फेडरेशनच्या भिंतीलगत कचरा पेटवून देण्याचा प्रकार सकाळी 6.25 वाजता निदर्शनास आला. त्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात 7.12 वाजता मक्तेदाराची महिला झाडू कामगार जमा केलेल्या कच-याला पेटवून देण्याचे काम करताना आढळून आली. कुंडी भरल्यामुळे तो पेटवल्याचे कामगारांनी सांगितले.
† ‘डी मार्ट’समोर युनिट क्रमांक 10मध्ये निरीक्षक के.के.बडगुजर हजर होते. सकाळी 7 वाजता कर्मचारी यायला सुरुवात झाली. 8 पुरुष आणि 2 महिला कर्मचारी उपस्थित होते. प्रत्यक्षात या युनिटमध्ये 53 कायम, तर 44 ठेकेदाराचे रोजंदारी कर्मचारी देण्यात आलेले आहेत.
† मू.जे.महाविद्यालयामागे असलेल्या कॉलन्यांमध्ये मंगळवारी सकाळी 6.15 वाजता सफाई कर्मचारी फिरकलेच नाहीत. तसेच महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेली एक कचराकुंडी ओव्हरफ्लो झाली होती, तर लक्ष्मीनगरात रस्त्याच्या कडेलाच कच-याचे ढीग साचलेले होते. मीनाताई ठाकरे कॉम्प्लेक्सच्या परिसरातही हेच चित्र दिसून आले.


सर्वेक्षणाची वेळ
सकाळी 6 ते दुपारी 12.45 पर्यंत
या ठिकाणी केली ‘दिव्य मराठी’च्या टीमने पाहणी
शिवाजीनगर, नवीपेठ, जुने जळगाव, अयोध्यानगर, सिंधी कॉलनी, मेहरूण तलाव, आदर्शनगर, गणपतीनगर, महाबळ, रामानंद, एम.जे. कॉलेज परिसर, रिंगरोड,
गणेश कॉलनी, कोर्ट चौक, नेहरू चौक, शास्त्री टॉवरसह शहरातील इतर भाग.


यंत्रणा नावालाच!
38 घंटागाड्या, 10 ट्रॅक्टर, 4 कॉम्पॅक्टर व 15 लोडर ही यंत्रणा सांगायला आहे. यातील बहुतांश वाहने बंदच असतात.
घंटागाड्या नसल्याने पेटवतात कचरा