आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon City In Continues Travels Entry Three On Crime

जळगाव शहरात ट्रॅव्हल्सची घुसखाेरी सुरूच; तिघांवर दंडात्मक कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात ट्रॅव्हल्सला बंदी घालण्यात अाली तरी देखील ट्रॅव्हल्सची घुसखाेरी सुरू अाहे. बुधवारी रात्री वाजता नॉन पार्किंग झोनमध्ये आढळून आलेल्या तीन ट्रॅव्हल्सवर शहर वाहतूक शाखेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी अध्यादेश काढून ट्रॅव्हल्सना शहरात येण्यास बंदी घातली आहे. मात्र, या अध्यादेशाचे उल्लंघन करून चालक शहरात ट्रॅव्हल्स आणत आहेत. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी चालकांना कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्याला जुमानता चालक शहरात विविध ठिकाणी ट्रॅव्हल्स उभ्या करीत होते. त्यामुळे अखेर बुधवारी निरीक्षक सरोदे यांनी अग्रवाल हॉस्पिटल, इच्छादेवी चौक आणि आकाशवाणी चौकात उभ्या असलेल्या मनीष ट्रॅव्हल्स (एमएच-१२-एचबी-२८६१), श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स (एमएच-१६-बीसी-००४५) आणि अंकल ट्रॅव्हल्स (एमएच-१९-वाय-६१२७) या तीन गाड्यावर कारवाई करून त्या प्रवाशांसह शहर वाहतूक शाखेसमोर आणल्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. त्याचप्रमाणे भरधाव वेगाने दुचाकी चालवणे, वाहतूक परवाना नसणे, नियमांचा भंग करणाऱ्या १३३ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहरात ट्रॅव्हल्सला बंदी असताना बुधवारी ट्रॅव्हल्स् अाढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्या गाड्या शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणून कारवाई केली.

चालकांनी नियम पाळावे
नेरीनाकायेथेट्रॅव्हल्स थांबण्यासाठी जागा दिली आहे. तेथेच ट्रॅव्हल्स उभ्या करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही चालक थांब्यावर ट्रॅव्हल्स उभ्या करता शहरात रस्त्यावर त्या उभ्या करीत होते. त्यांना इशाराही देण्यात आला होता. परंतु त्यांनी नॉन पार्किंग झोनमध्ये ट्रॅव्हल्स उभ्या करणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे बुधवारी कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे. चंद्रकांत सरोदे, पोलिसनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा