आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात १० मिनिटांत दाेन साेनसाखळ्या लांबवल्या, सीसीटिव्हीत कैद झाले चोरटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव ; भिकमचंदजैन नगर गुजराल पेट्राेलपंप परिसरातून मंगळवारी सकाळी १०.३० ते १०.४० दरम्यान ११० मिनिटांत चाेरट्यांनी ३८ ग्रॅम वजनाच्या लाख हजार रुपयांच्या दाेन साेनसाखळ्या लांबवल्याची घटना घडली. तसेच बीजे मार्केटमध्ये सकाळी ११.३० वाजता व्यापाऱ्याच्या खिशातून ४९ हजार रुपये चाेरणाऱ्या चाेरट्याला जिल्हापेठ पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे.
शहरात गेल्या तीन महिन्यांनंतर पुन्हा साेनसाखळी चाेरीची घटना घडली असून पाेलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी हाेत अाहे.

धक्का देऊन अाेढली चेन
घटना : शीतलराहुल शिंपी (वय २९, रा. कल्याण) यांना गुजराल पेट्राेल पंपाच्या बाजूच्या गल्लीत राहत असलेल्या मावशीकडे जायचे हाेते. यासाठी त्या मंगळवारी सकाळी १०.४० वाजता रिक्षाने पेट्रालपंपाजवळ पती राहुल शिंपी, अाई शकुंतला शिंपी मुलगीसह अाल्या हाेत्या. रिक्षातून उतरल्यानंतर शीतल यांच्यापासून तिघे जण काही अंतरावर पुढे चालत हाेते. त्याचवेळी समाेरून काळ्या रंगाच्या पल्सरवर दाेन २५ ते २६ वयाेगटातील तरुण अाले. दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने शीतल यांना धक्का मारून १५ ग्रॅम वजनाची ४६ हजार रुपयांची साेनसाखळी अाेढून नेली. त्यांनी अाराडाअाेरड केली. तसेच पती राहुल मागे पळत अाले. त्यांनी एका माेटारसायकलस्वाराच्या मदतीने चाेरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चाेरटे एरंडाेलच्या दिशेने पसार झाले. दरम्यान, हे चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

जिल्हापेठ पाेलिसांनी पाठलाग करून पकडले चाेरट्याला
घटना: भिकमचंदजैन मार्केटजवळ मंगळवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास गजानन मेडिकल स्टाेअर्सचे संचालक नितीन लालापुरे (वय ५२) हे बँकेत भरणा करण्यासाठी ४९ हजार रुपये घेऊन चालले हाेते. त्या वेळी एका चाेरट्याने त्यांच्या खिशातील ४९ हजार रुपये अलगद लांबवले. हा प्रकार त्यांच्या लक्षात अाल्यानंतर त्यांनी अारडाअाेरड केला. त्यामुळे अाठवडे बाजारात नाकाबंदी करीत असलेले जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र मेंढे, अल्ताफ पठाण अाणि बन्सीलाल पाटील हे धावून गेले. त्यांनी चाेरट्याला काही अंतर पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून चाेरलेले पैसे हस्तगत केले. मात्र, त्याचा एक साथीदार फरार हाेण्यात यशस्वी झाला. पकडलेला चाेरटा त्याचे नाव चांद महंमद (रा. दिल्ली) असे सांगताे. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गुजराल पेट्रोलपंप बी. जे. मार्केट येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

महिलांना दिवसा फिरणेही झाले धाेक्याचे
रात्रीच्याअंधारात किंवा माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या महिलांची साेनसाखळी लांबवण्याचे काम चाेरटे करीत हाेते. मात्र, मंगळवारी १०.१५ ते १०.३० वाजेदरम्यान वर्दळीच्या रस्त्यावर गुजराल पेट्राेलपंपाच्या बाजूच्या गल्लीत अाणि भिकमचंद जैननगरात साेनसाखळ्या लांबवल्या अाहेत. त्यामुळे चाेरट्यांनी पाेलिसांना एक प्रकारे खुले अाव्हानच दिले अाहे. त्यामुळे महिलांना शहरात दिवसा फिरणेही धाेक्याचे झाले अाहे.

महिलेला मंदिराचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून लांबवली पाेत
घटना: भिकमचंदजैननगरातील माेतीमहल चाैकातल्या राेहित अपार्टमेंटजवळ मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सुमन शांताराम वाघ (वय ५६) या कंपाउंडच्या गेटजवळ नातवाला खेळवत हाेत्या. त्या वेळी काळ्या रंगाच्या पल्सर गाडीवरून काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले दाेन सावळ्या रंगाचे तरुण अाले. त्यांनी माेटारसायकल उभी करून ‘मावशी दत्त मंदिर कुठे अाहे,’ असे विचारले. त्या वेळी वाघ या त्यांना मंदिराचा रस्ता दाखवित असताना चाेरट्याने क्षणार्धात माेटारसायकल गेटजवळच्या रॅम्पवर चढवली.
तर मागे बसलेल्या तरुणाने वाघ यांच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाची ५६ हजार रुपये किमतीची साेनसाखळी हिसकावली. त्यानंतर काही कळायच्या अात ते दाेघे बजरंग बाेगद्याच्या दिशेने पसार झाले. या वेळी वाघ त्यांचा नातू शंतनू याने अारडाअाेरड केली. मात्र, ताेपर्यंत चाेरट्यांनी पाेबारा केला हाेता. मागे बसलेल्या चाेरट्याच्या हातात काळ्या रंगाची बॅग हाेती.