आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील कानाकाेपरा चकाचक, धर्माधिकारी प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी स्वच्छता माेहीम राबवण्यात आली. या माेहिमेत प्रतिष्ठानच्या पाच हजार २०० ‘श्री’सेवकांनी जळगाव शहर चकाचक केले. या माेहिमेंतर्गत २३० टन ओला, तर ४३१ टन कोरडा कचरा उचलण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ संकल्पनेला साकार करण्यासाठी डाॅ.धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. त्यात शहरात ज्या-ज्या ठिकाणी ‘श्री’सेवकांच्या साप्ताहिक बैठका होत असतात, तेथील स्वयंसेवकांना पंधरा दिवसांपूर्वी या माेहिमेबाबत सूचना देण्यात आली होती. त्यानुसार रविवारी सकाळी ६.३० वाजता नियोजन केल्यानुसार शहरात २०-२०च्या गटात पाच हजार २०० ‘श्री’सेवक विभागले गेले. त्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत संपूर्ण शहर झाडून कचरा उचलून स्वच्छता केली. अतिशय नियोजनबद्धरीत्या ही माेहीम पार पडली. त्यात सहभागी झालेल्या सेवकांना प्रतिष्ठानतर्फे हॅण्डग्लोव्हज मास्क पुरवण्यात आले होते.

महापालिका इमारतीजवळ उद्घाटन
या माेहिमेचे औपचारिक उद्घाटन महानगरपालिका इमारतीजवळ करण्यात अाले. या वेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, महापौर राखी सोनवणे, खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन, नितीन लढ्ढा, स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन बरडे, सुनील माळी, मोहन सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, सरिता नेरकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अग्रवाल, जैन, लढ्ढा बरडे यांनी शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळी ६.३० वाजता सदस्यांची हजेरी
माेहिमेत शहरातील जवळपास सर्वच ‘श्री’सेवक सहभागी झाले हाेते. प्रत्येक भागात होणाऱ्या बैठकांमध्ये दिलेल्या सूचनेनुसार २०-२० ‘श्री’सेवकांचा एक गट तयार करण्यात येऊन प्रत्येक गटात एक गटप्रमुख नेमण्यात आला होता. गटप्रमुखांनी सकाळी ६.३० वाजता उपस्थित सदस्यांची हजेरी घेऊन स्वच्छता करण्यात येणाऱ्या भागाची माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून स्वच्छता केली. तसेच स्वच्छता झाल्यानंतर सकाळी ११ वाजता पुन्हा एकदा हजेरी घेण्यात आली.

वर्षभर विविध उपक्रम
डाॅ.धर्माधिकारीप्रतिष्ठानतर्फे शुद्ध उत्तम आचार-विचार, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रौढ साक्षरता, बालसंस्कार केंद्र, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षलागवड संवर्धन, व्यसन निर्मूलन, जलाशय स्वच्छता आदी समाजाभिमुख उपक्रम वर्षभर राबवले जात असतात.
स्वच्छता मोहिमेत शहर वाहतूक शाखेसमोर आणि गोलाणी मार्केटजवळील अग्निशमन दलाच्या कार्यायानजीक मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करण्यात आला.

मोहिमेसाठी ७५ ट्रॅक्टर, जेसीबी, ३० छोटी वाहने २२ घंटागाड्यांची मदत
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्वच्छता मोहिमेत जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळील कोनशिलेची स्वच्छता करताना ‘श्री’ सेवक. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा उचलून नेताना झाडू मारताना तसेच कार्यालयासमोरील दुभाजकाची स्वच्छता करताना सेवेकरी.
बातम्या आणखी आहेत...