आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाणाबाजार मोकळा होणारच महापालिका ठाम; व्यापाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांवर प्रशासन करणार विचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील प्रमुख रस्ते मोकळे करण्यासाठी महापालिका प्रशासन पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेली अतिक्रमण मोहीम ठप्प झाली होती. तसेच आमदार सुरेश भोळे यांच्या म्हणण्यानुसार मनपा प्रशासनाने व्यापाऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत व्यापाऱ्यांनी शेड ओटे काढण्यास नकार दिला.
मात्र, रहदारी सुरळीत करण्यासाठी काही पर्याय सांगितले. दरम्यान, प्रशासनाने त्यांची बाजू ऐकून घेतली असली तरी रस्ते मोकळे करण्यासाठी आपल्याला समन्वयातून काम करावे लागेल, अशी भूमिका उपायुक्त प्रदीप जगताप यांनी स्पष्ट केली आहे.

दाणाबाजारातील रहदारीची समस्या सोडवण्यासाठी रेल्वे स्टेशनप्रमाणे या ठिकाणीही व्यावसायिकांनी दुकानाबाहेर लावलेले शेड ओटे काढण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली होती. यासंदर्भात दाणाबाजारातील व्यापाऱ्यांची उपायुक्त प्रदीप जगताप यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडताना वेदर शेड अतिक्रमणात येत नाहीत. त्यामुळे ते काढण्यात येऊ नये, अशी मागणी करत रहदारी सुरळीत करण्यासाठी पर्यायी पार्किंगची जागा सुचवली. त्यावर प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्या प्रशासनाने समजून घेतल्या. मात्र, रहदारी मोकळी झाल्यास नियमानुसार फुटांच्या वेदर शेडलाच परवानगी देण्यात येईल त्यापेक्षा जास्त असलेले शेड काढण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
बैठकीस दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, उपाध्यक्ष आश्विन सुरतवाला, कार्याध्यक्ष सतीश जगवाणी, सचिव मुकेश लोटवाला, सहसचिव संजय रेदासनी, देवकुमार पगारिया, अशोक लाठी, ललित सेठी, दिलीप तलरेजा, राजेश मेहता पालिकेचे अतिक्रमण अधीक्षक इस्माईल शेख, कनिष्ठ अभियंता संतोष धनगर, विजय मराठे, विलास सोनोनी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांची भूमिका
बँकेचे बेसमेंट पार्किंग उपयोगात आणले गेले पाहिजे.
वेदर शेड अडथळा ठरत नाहीत.
आधी अतिक्रमित ५० पोल हटवावेत.
दाणाबाजारातून एकेरी वाहतूक करावी.
रहदारी सुरळीत करण्यासाठी दोन माणसे देण्याची तयारी.
जादा बाहेर आलेले शेड स्वत:च काढून घेण्याची तयारी.
दाणाबाजार फुले मार्केटच्या मधील जागा पार्किंगला द्या.

प्रशासनाची भूमिका
दाणाबाजारातील बॅँकांशी पार्किंगसाठी पत्रव्यवहार करणार.
नियमानुसार दोन फुटांपेक्षा अधिक वेदर शेड नकोत.
अतिक्रमित पोल काढण्यासाठी संबंधित विभागांशी चर्चा करणार.
रहदारी सुरळीत करण्याबाबत वाहतूक शाखेला सांगणार.
जादा बाहेर आलेले शेड ओटे काढल्यास आम्ही काढणार.
पर्यायी पार्किंगसाठी जागा खुली करून देणार.
फळबाजारातील व्यापाऱ्यांनीही दाखवली तयारी
शिवाजीरोड (फळबाजार गल्ली)वरील व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानासमोरील पत्री शेड ओटे काढण्याची तयारी दर्शवली. मात्र, ते करण्यापूर्वी मागील बाजूला गटार बांधून देण्याची हॉकर्सना स्थलांतरित करण्याची मागणी केली. या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष महेश कुंडे, संदीप मंडोरा, जितेंद्र मुंदडा, दुर्गादास नेवे, संतोष ठाकूर, सतीश बलदवा, राहुल गालेचा आदी उपस्थित होते.