आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon City Shastri Tower Old Watch Reparing Demand

अफलातून घड्याळाला मिळेना संजीवनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची शान आणि मान असलेलं, अभियांत्रिकीचं एक अफलातून उदाहरण असलेलं हे घड्याळ मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी आहे. मात्र, इतक्या मोठय़ा कालावधीपासून बंद पडलेलं हे घड्याळ आम्ही दुरूस्त करून दाखवतो म्हणायला, अभियंते घडवायला निघालेल्या एकाही महाविद्यालयातील एकही प्राध्यापक समोर आला नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. एका तरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुढे येऊन ते दुरूस्त करण्याची जबाबदारी घ्यावी आणि त्या तंत्राचा आपल्या विद्यार्थ्यांनाही शिकण्यासाठी लाभ करून द्यावा, असे आवाहन ‘दिव्य मराठी’ करीत आहे. महापालिका प्रशासनानेही अशा संस्थेला, प्राध्यापकाला किंवा विद्यार्थ्याला ती संधी उपलब्ध करून द्यावी आणि जळगाव शहराची ही बंद पडलेली धडधड सुरू होऊ द्यावी, अशीही अपेक्षा आहे.

बरेलीहून येत होता तंत्रज्ञ
चावी भरून चालणारे हे घड्याळ नंतर इलेक्ट्रॉनिक मोटार बसवून चालवण्यात येत होते. बंद पडल्यास दुरुस्तीसाठी मध्यप्रदेशातील बरेलीहून बच्चननामक तंत्रज्ञ येत असे.

चार वर्षांपासून पत्ताच नाही
संबंधित तंत्रज्ञ चार वर्षांपासून संपर्कात नाही. त्याचा संपर्क क्रमांक बंद आहे आणि पाठवलेले पत्र ‘उपलब्ध नाही’ अशा शेर्‍याने परत येत असल्याने त्याचा पत्ता लागत नाही.

वर्षभर सुरू होते टॉवर उभारणीचे काम
माझे वय आज 72 वर्षे आहे. सुमारे 56 वर्षांपूर्वी म्हणजे 1957ला लग्न करून मी जळगावात आले. आम्ही तेव्हा आजच्या टॉवर व तेव्हाच्या विजयस्तंभ चौकाजवळ राहायला आलो. त्यावेळी या चौकात शनिवारचा बाजार भरायचा. जिल्हाभरातून बाजारासाठी बैलगाडीने लोक येत असत. तेव्हा या चौकात बांधलेल्या ओट्यावर बाजार भरायचा. बाजारासाठी आलेल्या बैलगाड्यांच्या रांगा थेट शिवाजीनगर पुलांपर्यंत लागायच्या. 1964 साली या चौकात लाल बहादूर शास्त्री टॉवरच्या बांधकामासाठी खोदकामाला सुरुवात झाली. टॉवर उभारण्याच्या कामाला सुमारे वर्षभराचा कालावधी लागला. शहरातील सर्वात मोठी इमारत म्हणून जिल्हाभरात तिची चर्चा होती. त्यामुळे त्याचे बांधकाम पहाण्यासाठी बैलगाड्यांनी लोक शहरात येत असत. त्यामुळे या चौकात खूप गर्दी व्हायची. ते पूर्ण झाल्यानंतर त्यावर भलेमोठे घड्याळ लावण्यात आले. ते पाहण्यासाठीही जिल्हाभरातून नागरिक येत असत.
शब्दांकन : विजय राजहंस