आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र निधीची तरतूदच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या तुटपुंज्या तरतुदीअभावी स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली असून, खासगी शाळांचे अनुदान बंद केल्यामुळे देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न अधांतरी लटकला आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळत नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

पालिकेकडून स्वतंत्र तरतूदच नाही
महापालिका शाळांमधील स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी एकदाच दोन युनिटसाठी निधीची तरतूद केली जाते. सन 2003पासून आवश्यकतेनुसार निधी दिला जात आहे; पण महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र तरतूद केलेली नाही. तथापि, शाळांच्या बांधकामासाठी 2013-14 या वर्षाकरिता 34 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

बांधकामासाठी निधी; पण देखभाल वार्‍यावर!
जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी सन 2012-13मध्ये मुलींच्या 106 व मुलांच्या 28 स्वच्छतागृहांच्या बांधकामाला मान्यता देण्यात आली होती. तसेच 2011-12मध्ये मुलींची 22 व मुलांची पाच स्वच्छतागृहे मंजूर करण्यात आली. एका स्वच्छतागृहासाठी एक लाख रुपयांप्रमाणे निधी मंजूर झाला आहे; पण त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र तरतूद जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात केलेली नाही.

निधीसाठी पालिकेकडे पाठपुरावा
महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद नाही; पण इमारतीच्या देखभाल- दुरुस्तीसाठी मिळणार्‍या निधीतून अत्यावश्यक दुरुस्ती केली जाते. स्वच्छतागृहांची स्वच्छता महापालिकेच्या तिजोरीतून केली जात आहे. तथापि, यासंदर्भात शिक्षण मंडळाने आयुक्तांकडे निधीची मागणी केली आहे.
-अशोक पानसरे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ