आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : तांबापुरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी; दोघांचे डोके फोडले, चार जखमी; सिव्हिलमध्ये तोडफोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव :  तांबापुरातील शाह अवलिया मशीदच्या ट्रस्टचा हिशेब मागितल्यावरून गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता दोन गटात वाद पुन्हा उफाळून आला. याचे पर्यावसन हाणामारीत होत मशीद ट्रस्टचे अध्यक्ष हनिफ शाह बाबू शाह त्यांच्या कुटुंबातील जणांसह इतरांनी मशिदीच्या समोरील टपरीजवळ फिराेज खान वसीम खान या भावांना लोखंडी सळया, काचेच्या बाटल्या लाकडी दांड्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही भावंडांसह चौघे जण जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्या ठिकाणी संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयाची ताेडफाेड केली. या घटनेमुळे सिव्हिल तांबापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला हाेता. या वेळी एमआयडीसी, शहर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात अाणली.
 
फिरोज खान अजीज खान (वय ३०) हे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता उपवास सोडल्यानंतर शाहवली मशिदीत नमाज पढण्यासाठी गेले हाेते. त्या ठिकाणी ट्रस्टचे अध्यक्ष हनिफ शाह बाबू शाह (वय ६०) यांनी फिराेज खान यांना जुन्या वादातून धमकावले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. शाह यांनी त्यांच्या नातेवाइकांना खान यांना मशिदीच्या बाहेर काढण्यास सांगितले. तसेच मशीदसमोरील चहाच्या टपरीजवळ हनिफ शाह त्यांचे नातेवाईक शरीफ शाह हनिफ शाह, आरिफ शाह हनिफ शाह, आसिफ शाह हनिफ शाह, एजाज शाह हनिफ शाह, तोहिद शाह हनिफ शाह, शाहिद शाह शरीफ शाह, मुख्तार शाह हनिफ शाह, शरीफ शाह हनिफ शाह यांच्यासह २० ते २५ जणांनी फिरोज खान,त्यांचा भाऊ वसीम खान भाचा रोशन खान हसन खान यांना काचेची बाटली, लोखंडी सळया, लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. अशी माहिती खुद्द फिराेज खान यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. दरम्यान, मारहाण झाल्यानंतर फिरोज खान हे बेशुद्ध झाले. त्यांच्या डोक्याला, हाताला पाठीला जबर मार बसला आहे. तर वसीम याच्या डोक्याला मार लागलेला आहे. तसेच तोहिद शाह आरीफ शाह (वय २०), हा सुद्धा जखमी झाले आहेत. घटनेनंतर तांबापुरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
 
 जिल्हा सामान्य रुग्णालयातदेखील २०० ते ३०० जणांचा जमाव जमला होता. संतप्त जमावाने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वाॅर्ड क्रमांत समोरील काचा फोडल्या. या वेळी परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहोल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवले. या प्रकरणात रोशन खान याच्या फिर्यादीवरून हनिफ शाह, आसिफ शाह, आरिफ शाह, एजाज शाह, तोहिद शाह, शाहिद शाह, मुख्तार शाह, शरीफ शाह यांच्यासह २० ते २५ जणांविरूध्द रात्री वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे शरीफ शाह यांच्या फिर्यादीवरून फिरोज खान, वसीम खान, शब्बीर खान, शाहरूख खान, वसीम चादरवाला, अब्दुल मिर्झा, शेख लुकमान बब्बू, रोशन खान यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इच्छा देवी चौकात रास्ता रोको : जिल्हा सामान्य रुग्णालयात तोडफोड केल्यानंतर संतप्त जमाव इच्छादेवी चौकात आला. या चौकात जमावाने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुऱ्हाडे कर्मचारी इच्छादेवी चौकात तातडीने दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. रात्री इच्छादेवी चौक, मशीद परिसर, गवळीपुरा जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. 
 
काय आहे नेमका वाद? 
शाह अवलिया मशीद ट्रस्टच्या गाळ्यामध्ये एकूण १५ दुकाने आहेत. या दुकानांचे दरमहा पंधराशे रुपये भाडे ट्रस्टला मिळते. झोळीच्या माध्यमातून मागण्यात येणारे दान दर आठवड्याला सुमारे २० हजार रुपये जमा होते. या माध्यमातून ट्रस्टला उत्पन्न मिळते. ट्रस्टचे सन १९८५ पासून हनिफ शाह त्यांचे कुटुंबीय ट्रस्टी आहेत. ते समाज बांधवांना ट्रस्टचा हिशेब देत नाहीत. या हिशेबावरून लुकमान शेख यांना पाच महिन्यांपूर्वी मारहाण करण्यात आली होती. लुकमान यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी फिरोज खान यांनी मदत केली होती. त्या वेळी हनिफ शाह यांनी मारण्याची धमकी दिली होती. याच जुन्या वादावरून गुरुवारी मारहाण झाल्याचे फिराेज खान यांनी सांगितले. 
 
गुन्हा दाखल झाल्यास एसपी ऑफिसमध्ये आंदोलन 
हनिफ शाह त्यांच्या नातेवाइकांवर गुन्हे दाखल केल्यास शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा फिरोज खान यांनी दिला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रस्टचा हिशेब देण्याबाबत अर्ज देण्यात आलेला आहे. मात्र, पोलिसांनी या विषयात मध्यस्थी केली नसल्याचा आरोप जखमींच्या नातेवाइकांनी केला आहे.