आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Coropration Worker Heart Attack And Cancer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्यात बिघाड: पालिकेत वाढला हृदयविकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कामाचा ताण वाढत असल्याने महापालिकेतील अधिकार्‍यांचेच नव्हे, तर कर्मचार्‍यांचेदेखील आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हृदयविकार, कर्करोगाने त्रस्त असलेल्या कर्मचार्‍यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. कर्मचार्‍यांच्या वैद्यकीय खर्चावर चालू आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत महापालिकेचे 21 लाख 64 हजार रुपये तर चार वर्षात पावणेदोन कोटी रुपये खर्च झाले आहेत.

महापालिकेत येण्यास सक्षम अधिकारी तयार नसल्याने आहे त्या मनुष्यबळात कामाचा गाडा हाकला जात असल्याने कर्मचारी व अधिकार्‍यांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. एकच कर्मचारी व अधिकार्‍यावर अनेक विभागांची अतिरिक्त जबाबदारी आहे. महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक प्रवीण पंडित यांच्यावर उपायुक्तपदाचा ताण वाढल्याने त्यांना उपचारासाठी दाखल होण्याची वेळ आली. सहा विभागांची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणारे सहायक आयुक्त पी.डी. सोनवणे यांची प्रकृती बिघडल्याने दोन महिने ते रजेवर आहेत. पालिकेतील कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या नातलगांच्या वैद्यकीय उपचाराची आकडेवारी पाहता दोन वर्षांत हृदयरोगाच्या प्रकरणांची संख्या वाढली आहे.

तिघांचा मृत्यू; दोघांना झटके

पालिकेतील रघुनाथ नाईक, वसंत सपकाळे, अशोक भावसार या तीन कर्मचार्‍यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे तर गेल्या महिन्यात आस्थापना विभागातील प्रकाश मोरे यांना व प्रभाकर शिंपी या दोन कर्मचार्‍यांना ड्युटीवर असतानाच हृदयविकाराचे झटके आले आहेत.

अग्रीमच्या रकमेलाही कात्री

शासनाने मान्यता दिलेल्या हृदय शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कर्करोग या पाच गंभीर आजारांवर शस्त्रक्रियांवर उपचार घेण्यासाठी प्रचलित खर्च विचारात घेऊन अग्रीम देण्याची सुविधा आहे. याची र्मयादा एक ते दीड लाख रुपयांपर्यंत आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने अग्रीमची र्मयादा कमी करीत 50 हजारांपर्यंत आणण्यात आली आहे.

यासाठी मिळतो खर्च

हृदयविकाराचा झटका, अति रक्तदाब, धनुर्वात, घटसर्प, अपघात, तीव्र उदरवेदना, जोरदार रक्तस्राव, गॅस्ट्रो एन्ट्रायटिस, विषमज्वर, कोमा, मनोविकृतीची सुरुवात, दृष्टिपटल सरकणे, वायुदोष, कान, नाक, घसा यांच्याशी संबंधित विकार, ब्रेन ट्यूमर, भाजणे, इपिलेप्सी, अँक्यूट ग्लॅकोमा, मज्जारज्जूशी संबंधित आजार, रक्तासंबंधी आजार, सर्पदंशाने होणारी विषबाधा, रसायनांमुळे होणारी विषबाधा या व्यतिरिक्त हृदयाशी संबंधित विकार अशा एकूण 32 आजारांच्या उपचाराचा खर्च देण्याची तरतूद आहे.