आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका - प्रभाग समित्यांवर खाविआचेच वर्चस्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेत प्रभाग समित्या गठण करण्यासाठी उपमहापौर सुनील महाजन यांच्यातर्फे नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या नवीन प्रस्तावानुसार चारपैकी तीन समित्या खाविआच्या ताब्यात आहेत. प्रभाग चारमध्ये राष्ट्र वादीला बक्षिशी म्हणून सभापतिपद दिले जाऊ शकते. दरम्यान, या सर्व प्रभाग रचनेच्या प्रक्रियेमध्ये मनसे व भाजपला सभापतिपदापासून दूर रहावे लागणार आहे.

महापालिका प्रशासनातर्फे प्रस्तावित करण्यात आलेली प्रभाग समिती रचना नामंजूर करत सत्ताधारी गटातर्फे आपल्या सोयीने नवीन रचना करण्याचा ठराव नुकत्याच झालेल्या महासभेत
मंजूर केला आहे. या नवीन प्रस्तावानुसार प्रभाग समिती एक ते तीनमध्ये खान्देश विकास आघाडीचे वर्चस्व राहणार असून सभापतीही त्यांचाच बसणार आहे. प्रभाग चारमध्ये स्पष्ट बहुमत नसले तरी मित्रपक्षाने केलेल्या मदतीची परतफेड म्हणून राष्ट्र वादी कॉँग्रेसला सभापतिपदाची बक्षिशी दिली जाण्याची शक्यता आहे.

प्रभाग समिती क्रमांक 1 : प्रस्तावित प्रभाग रचनेनुसार प्रभाग समिती एकमध्ये 22 पैकी 13 नगरसेवक खाविआचे आहेत. भाजपचे सहा, राष्ट्र वादीचे दोन तर मविआचा एक नगरसेवक आहे. 22 पैकी 13 जागांच्या बहुमताच्या आधारे प्रभाग समिती 1 च्या सभापतिपदी ‘खाविआ’ चा सभापती होणार आहे. या प्रभागातील जातीय समीकरणे पाहता दत्तू कोळींच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडू शकते.

प्रभाग समिती क्रमांक 2 : प्रस्तावित प्रभाग रचनेनुसार प्रभाग समिती दोनमध्येदेखील 22 नगरसेवक आहेत. यापैकी 10 नगरसेवक खान्देश विकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहा, भारतीय जनता पक्षाचे चार, राष्ट्र वादी कॉँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत. खाविआचे बहुमत असल्याने गणेश सोनवणे किंवा इकबाल पिरजादे यांना सभापतिपद दिले जाऊ शकते.

प्रभाग समिती क्रमांक 3 : प्रस्तावित प्रभाग रचनेनुसार प्रभाग समिती तीनमध्ये एकूण 15 नगरसेवक आहेत. यापैकी खान्देश विकास आघाडीचे सात, भारतीय जनता पक्षाचे पाच, जनक्रांती दोन, राष्ट्र वादी कॉँग्रेस एक असे बलाबल होते. यापैकी ‘खाविआ’ आणि जनक्रांतीचे मिळून नऊ सदस्य संख्या होते. या प्रभागात येणा-या वॉर्डातील जातीय समीकरणे पाहता हेमलता नाईक किंवा संगीता राणे यांना संधी दिली जाऊ शकते.