आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Corporation Give Application In DRT Court

महापालिकेने केला डीआरटी कोर्टात पुनर्विलोकन अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - डीआरटी न्यायालयाने दिलेली ऑर्डर रिकॉल करून आम्हाला बाजू मांडण्याची संधी द्यावी, यासाठी महापालिकेच्या वतीने सोमवारी डीआयटी कोर्टात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला आहे. यात डीआरटी न्यायालयाला माहिती नसलेल्या अनेक बाबी मांडण्यात आल्या आहेत.
हुडकोकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासंदर्भात एकरकमी परतफेडीबाबत पालिकेचे बोलणे सुरू होते. मात्र, पालिकेला अंधारात ठेवून हुडकोने डीआरटी कोर्टात सुनावणी घेतली. यात पालिकेने हुडकोला ३४० कोटी रुपये भरावे, असे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध पालिकेने अपिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या आठवड्यात डीआरटी कोर्टात दाखल करायचे कागदपत्रांची निश्चिती करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी दुपारी पालिकेच्यावतीने पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्यात आला. हुडकोने कशा पद्धतीने काही गोष्टी लपवल्या याची माहिती यात देण्यात आली आहे.

प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून काही बाबी स्पष्ट करण्यात आल्या असल्या तरी युक्तिवादात यावर आणखी प्रकाश टाकला जाणार आहे. याबाबत सुनावणीची तारीख अद्याप निश्चित नाही. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातही २८ रोजी कामकाज होणार आहे. यात लेखी बाजू मांडली असली तरी ज्येष्ठ विधीतज्ज्ञांच्या माध्यमातून पालिकेची भूमिका मांडली जाणार आहे.