आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Corporation Commissioner Not Cooperating

मनपा अायुक्त विश्वासात घेत नाही, सभापतींची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची सूत्रे स्वीकारून चार महिने उलटले तरीही अायुक्त विश्वासात घेत नाहीत केलेल्या सूचनांचे पालन हाेत नाही. तसेच शहरातील नागरिकांच्या तक्रारींचाही निपटारा हाेत नसल्याने सभापती ज्याेती चव्हाण यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची भेट घेऊन तक्रार केली.

शहरातील कामांनिमित्त अायुक्तांना फाेन केला असता, ते फाेन उचलत नाहीत. मूलभूत सुविधांबाबत काही सांगितल्यास त्याची अंमलबजावणी हाेत नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पालिकेची स्थिती सुधारण्यासाठी पालकमंत्री महसूलमंत्री या नात्याने प्रयत्न करावेत, असे साकडेही घातले. दरम्यान, यापूर्वीही सभापती चव्हाण यांनी अायुक्तांच्या कार्यपद्धतीबद्दल महसूलमंत्री खडसेंकडे राेष व्यक्त केला हाेता.

प्रभाग समित्यांना पत्र

पालिकेच्या चारही प्रभागांतर्गत एलबीटी विभागात दरराेज हाेणारी वसुली केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यात यावा, असे लेखी पत्र सभापती चव्हाण यांनी दिले अाहे. तसेच सभापती या नात्याने पालिकेच्या तिजाेरीत जमा हाेणाऱ्या पैशांची माहिती व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली अाहे.