आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव मनपाला हवाय तरुण, तडफदार शहर अभियंता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिकेच्या शहर अभियंता पदावर शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणारा व्यक्ती निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने प्रभावी कामगिरी बजावत नाही. उलट पालिकेलाच त्यांचे वेतन भत्ते अदा करण्याचा खर्च सोसावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने आस्थापनेवरील अथवा जाहिरात देऊन तरुण, तडफदार, अनुभवी व्यक्तीची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव खाविआने दिला आहे. यावर २४ एप्रिलच्या महासभेत चर्चा होईल.

महापालिकेचे शहर अभियंता सी.जी.पाटील हे एप्रिल २०१५ मध्ये सेवानिवृत्त होत आहेत. नगरपालिकेचे पालिकेत रूपांतर होऊन सुमारे १२ वर्षे उलटले. शहर अभियंतापदी शासनाकडून नेहमी प्रतिनियुक्तीवर अधिकारी येत असतात.
निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अधिकाऱ्यांचा नाही प्रभाव
बऱ्याचदा अधिकारी हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतात. त्यामुळे त्यांच्यात काम करण्याचा उत्साह राहत नाही. तसेच स्थानिक रहिवासी नसल्याने शहराच्या दृष्टीने त्यांना आपुलकीही नसते, असे खाविआचे नेते नितीन लढ्ढा यांनी प्रस्तावात म्हटले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून प्रभावी काम होत नाही. त्यामुळे पालिकेने आपल्या आस्थापना सूचीवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अथवा जाहिरात देऊन तरुण उमेदवाराची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.