आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षेत्रसभेचा चेंडू प्रभाग अधिकाऱ्यांकडे, रचना अाणि कार्यप्रणालीबाबत तरतुदींचा अभ्यास सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार क्षेत्रसभा घेतल्यास अपात्रतेची तरतूद अाहे. याविषयाकडे 'दिव्य मराठी' ने लक्ष वेधले हाेते. त्यानंतर याप्रकरणी कायदेशीर बाबींची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे अादेश अायुक्तांनी नगरसचिवांना दिले हाेते. मात्र, ही बाब प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील असल्याचा मुद्दा पुढे करत त्यांनी हे अादेश प्रभाग अधिकाऱ्यांकडे वर्ग केले अाहेत.
क्षेत्रसभेच्या तरतुदीसंदर्भात 'दिव्य मराठी'ने लक्ष वेधताच माहिती अधिकार प्रशिक्षक दीपक गुप्ता यांनी अायुक्तांना अर्ज दिला हाेता. सभा झाल्या नसल्यास याला जबाबदार काेण, अशा अाशयाची विचारणा त्यांच्याकडून करण्यात अाली हाेती. दरम्यान, अायुक्त संजय कापडणीस यांनी नगरसचिवांना याप्रकरणी कायदेशीरबाबींची तपासणी करून अहवाल देण्याचे अादेश दिले हाेते. यावर ही नगरसचिव कार्यालयाच्या अख्त्यारीतील नव्हे तर प्रभाग अधिकाऱ्यांच्या अख्त्यारीतील बाब असल्याने त्यांच्याकडून अायुक्तांचे अादेश प्रभाग अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात अाले अाहे. क्षेत्रसभेसंदर्भात अाधिच नगरसेवक संभ्रमात असताना चाैकशीचा चेंडू प्रभाग कार्यालयांकडे वळवल्याने गाेंधळ वाढण्याची शक्यता अाहे. सभेच्या नियाेजनाची जबाबदारी नगरसचिव कार्यालयाची की प्रभाग अधिकाऱ्यांची, असा नवीन वाद उपस्थित हाेऊ शकताे.
कायदे तज्ज्ञांचा सल्ला
महाराष्ट्रमहापालिका अधिनियमातील कलम २९ (क) मधील तरतुदीनुसार अपात्रतेच्या भीतीने नगरसेवकांमध्ये घबराटीचे वातावरण अाहे. या कलमात नेमकी काय तरतूद दिली अाहे, याचा अभ्यास नगरसेवकांकडून केला जात अाहे. क्षेत्रसभेची रचना, तिचे कार्य अाणि जबाबदारी यबाबात तज्ज्ञांचा सल्लाही घेतला जात अाहे.
नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
क्षेत्रसभेचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याची जबाबदारी कुणाची? कार्याध्यक्ष सभा बाेलवू शकताे, अशी कायद्यात तरतूद अाहे. मात्र, कार्याध्यक्ष म्हणजे काेण, यासंदर्भात अधिनियमात स्पष्ट तरतूद नसल्याचे मत नगरसेवक गणेश साेनवणे यांनी व्यक्त केले. सर्वच नगरसेवकांना कायद्याचे ज्ञान असेलच असे नाही. त्यामुळे प्रशासनानेच या गाेष्टींची काळजी घ्यायला हवी, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. तर ज्याेती चव्हाण यांनी अापल्या वाॅर्डात २५ मार्च २०१५ राेजी एक क्षेत्रसभा घेतली असल्याचे इतिवृत्त सादर केले अाहे. मात्र, किती कालावधीनंतर दुसरी सभा घेणे अावश्यक अाहे, याची कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.