आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Corporation Property Tax Department Now Open On Holidays

सुटीच्या दिवशीही पालिकेतील घरपट्टी विभाग सुरू राहणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेने घरपट्टीत १० टक्के सूट देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी तब्बल ४४ लाखांचा भरणा करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या चारही प्रभाग समितीमध्ये शनिवारी रविवारी सुटीच्या दिवशीदेखील कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्च एंडींगचे काम उशिरापर्यंत १० टक्के सूट देण्याचा निर्णय जाहीर झाला नव्हता. परंतु गेल्या आठवडाभरात नागरिक लाभ घेत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी पालिकेने सुटीच्या दिवशी सुद्धा कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे उपायुक्त प्रदीप जगताप, अविनाश गांगोडे यांनी सांगितले.