आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पगार होत नसल्याने महापालिका शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिका शिक्षण मंडळाच्या शाळांतील शिक्षकांना वर्षभरापासून वेतन अदा करण्यात आलेले नाही. वेतन आणि निवृत्तिवेतन मिळण्यासाठी सोमवारी ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच त्याची दखल प्रशासनाने न घेतल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने दिला आहे.

महापालिकेसमोर सोमवारी (दि.२७) दुपारी १२ वाजेनंतर ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये बारा महिन्यांचे वेतन अदा करावे, सहा महिन्यांचे निवृत्तिवेतन अदा करावे, उच्च प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांना विनाविलंब नियुक्ती आदेश द्यावेत, सन २०००नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगाची रक्कम दोन हप्त्यांत देण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे.