जळगाव - वारंवार निवेदने देऊन, धरणे, अांदाेलन करून फायदा हाेत नसल्याने पालिकेतील ११ शिक्षकांनी अंगावर राॅकेल अाेतून अात्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कामगारदिनी पालिकेच्या प्रवेशद्वारात शिक्षकांनी अांदाेलन केले. दरम्यान, अाठवडाभरात एक पगार देण्याचे अाश्वासन पालिका प्रशासनाने दिले.
पालिकेच्या २१३ शिक्षकांचे १२ महिन्यांपासूनचे वेतन थकवण्यात अाले हाेते. यासह निवृत्त शिक्षकांचे पेन्शनही थकले अाहे. पगार पेन्शन मिळावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघातर्फे शुक्रवारी पालिकेच्या प्रांगणात संघटनेचे अध्यक्ष समाधान साेनवणे यांच्या नेतृत्वाखाली अांदाेलन करण्यात अाले.
प्रशासनाविराेधात घाेषणाबाजी करण्यात येऊन पगार थकवल्याचा निषेध करण्यात अाला. अध्यक्ष समाधान साेनवणे यांच्या १० शिक्षकांनी अंगावर राॅकेल टाकले. मात्र, उपस्थित पाेलिसांनी शिक्षकांना अडवून ताब्यात घेतले.
अांदाेलन प्रसंगी तुषार चाैधरी, संदीप बांगर, इम्रान खाटीक, शेख अब्दुल्ला, महेश पाटील, सतीश घुगे, ईश्वर पाटील, मनीषा सूर्यवंशी, याेेगीता कापसे, हिंमत ढवळे, राजेंद्र राजपूत, तन्वर शहा, मुजावर शकीर, हिदायतुल्ला खाटीक, अशाेक सैंदाणे, मीनाक्षी अत्तरदे, विजय तगरे उपस्थित हाेते.
अांदाेलनप्रसंगी संघटनेचे सल्लागार हरिशचंद्र साेनवणे यांनी मार्गदर्शन केले. अांदाेलनानंतर डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात सर्व शिक्षकांची बैठक घेण्यात अाली. यात पालिका प्रशासनाने पगार, पेन्शन दिल्यास अांदाेलन तीव्र करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात अाले. दरम्यान अाठवडाभरात एक पगार देण्याचे अाश्वासन प्रशासनाने दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष समाधान साेनवणे यांनी स्पष्ट केले अाहे.