आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेकप्रकरणी पुजार्‍याच्या मुलांना केली अटक; विराफ पेसुनांसह चौघांना जामीन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आदर्शनगरातील रुस्तमजी शाळेच्या परिसरात असलेल्या गणपती मंदिराच्या पुजार्‍यास मारहाण करून शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात रुस्तमजी विद्यालयाचे प्राचार्य विराफ पेसुना यांच्यासह अन्य तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या चारही जणांचा जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, मंगळवारी रुस्तमजी शाळेवर दगडफेक केल्याप्रकरणी पुजार्‍याच्या मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.

गणपती मंदिराचे पुजारी रामपाल भाटिया यांना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पुजारी भाटिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्राचार्य पेसुना, त्यांचा भाऊ भुरजीन पेसुना, नितीन पारेकर व विनोद मधुकर यांना शाळेच्या परिसरातून अटक केली. त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात हजर केले असता, या चारही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

मंगळवारी दुपारी शाळेवर झाली दगडफेक
मंगळवारी दुपारी रुस्तमजी शाळेवर दगडफेक करून प्राचार्यांच्या दालनाच्या काचा फोडत सुपरवायझरला मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास रुस्तमजी शाळेच्या परिसरात काही जणांनी गर्दी केली होती. त्यातील तीन ते चार जण शाळेच्या मागच्या बाजूच्या भिंतीवरून उडी मारून आत आले व त्यांनी जवळच पडलेल्या विटा उचलून थेट प्राचार्यांच्या दालनावर फेकल्या. हा आवाज ऐकून कर्मचारी व शिक्षक बाहेर आले. या वेळी दगडफेक करणार्‍यांपैकी एकाने महिला सुपरवायझर कामिनी भट यांना धक्काबुक्की करत ‘तुम्ही आमच्या गणपतीचा हात तोडला; आम्हीही तुमचा हात तोडू’ असे सांगत शिवीगाळ करत तिथून पळ काढला. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने लागलीच जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसदेखील घटनास्थळी तत्काळ दाखल झाले; मात्र तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी उशिरा याप्रकरणी पुजार्‍याची मुले अजय भाटिया, विनोद भाटिया व विजयकुमार जैन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.