आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून दोघांना बेदम मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एकाच समाजातील दोन विवाहित तरुण, तरुणीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना 10 ते 15 महिला, पुरुष नातेवाइकांनी बेदम मारहाण केली. एवढय़ावरच न थांबता दोघांना विवस्त्र करून त्यांचे मोबाइलमध्ये फोटोही काढले. ही खळबळजनक घटना पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे रविवारी रात्री घडली. मात्र, हा प्रकार बुधवारी उघडकीस आला.

खडकदेवळा येथील प्रवीण पाटील आणि गावातील एका 28 वर्षीय विवाहित महिलेचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोघांचाही संसार काडीमोड होण्यावर येऊन ठेपला होता. दोघे पाचोर्‍यात लिव्ह इन रिलेशनशिपप्रमाणे भाड्याच्या खोलीत राहतात. मात्र, त्यांचे एकत्र राहणे महिलेच्या सासरच्या लोकांना रुचले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास प्रवीण याला खळ्यातून उचलून गाडीत घालून नेले. पाचोरा येथे राहत असलेल्या खोलीत नेऊन दोघांना दोन तास बांधून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना विवस्त्र करून पुन्हा मारहाण केली. मोबाइलमध्ये चित्रीकरणही केले. हा सगळा प्रकार केल्यानंतर पोलिसांना पाचारण करून दोघांना रंगेहाथ पकडल्याचा आव आणला.

पोलिसांनी घटनेची दखलच घेतली नाही: दोन पोलिसांनी घटनास्थळी येऊन तरुण, तरुणीला शिवीगाळ करून काढता पाय घेतला. मारहाण करणार्‍यांवर कारवाई करणे तर सोडाच विवस्त्र मरणासन्न पडलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्याची तसदीसुद्धा त्यांनी घेतली नाही. तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी ठाण्यातून हाकलून दिल्याचा आरोप पीडित तरुणीने केला. घटनेच्या चार दिवसांनी प्रसार माध्यमांनी दखल घेतल्यानंतर बुधवारी रात्री संबंधितांचे जबाब घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.