आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीवर दगडफेक करून तरुण पसार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बसस्थानकावरून चोपड्याकडे जाणार्‍या जळगाव-चोपडा एसटीवर प्रजापतनगरात दोन अनोळखी तरुणांनी रविवारी सायंकाळी 6 वाजता दगडफेक केली. तसेच त्यांनी चालकास मारहाण केल्याने तो जखमी झाला आहे. घटनेबाबत पोलिसांना तत्काळ माहिती देऊनदेखील ते तासभर उशिरा आल्याने नागरिक संतप्त झाले होते.

जळगाव आगारातून सायंकाळी एसटी (क्र. एमएच-20, डी-8900) ही चोपड्याकडे जाण्यासाठी निघाली. त्या वेळी (एमएच-19, एवाय-6313) या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून दोन तरुण बसचा पाठलाग करीत आले. त्यांनी थेट एसटीच्या पुढे मोटारसायकल आडवी लावून एसटी थांबवत पुढील काचेवर दगडफेक केली. तसेच चालक महेंद्र काशीनाथ पठाण यांना मारहाण करत पळ काढला. त्यानंतर चालकाने ही घटना शहर पोलिस ठाण्यात कळवली. मात्र, एक तास उलटूनही पोलिस घटनास्थळी दाखल झालेले नव्हते. या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.