आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जळगावच्‍या कन्‍येची अंतराळात सैर, कुटुंबीयाचे नाव केले उज्‍ज्‍वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यानाच्‍या स्‍पेसमध्‍ये अनिमा पाटील. - Divya Marathi
यानाच्‍या स्‍पेसमध्‍ये अनिमा पाटील.
जळगाव - पृथ्वीच्या कक्षेच्या पलीकडे मोबाइलचे तीव्र गतीचे सिग्नल पोहोचण्यास २० मिनिटे लागतील एवढ्या दूर अंतरावरील निर्जन, अज्ञात ग्राफोस ग्रहावर आम्ही चार अंतराळवीर होतो. चौघेही एकमेकांसाठी अनोळखी. पृथ्वीवरचे रहिवासी अर्थात मानवजात एवढाच समान धागा आमच्यात होता, हा परग्रहावरचा हा चित्तथरारक अनुभव आहे खान्देशकन्या अंतराळवीर अनिमा यांचा. अमेरिकी अंतराळ संस्था 'नासा'च्या सिम्युलेटेड (अर्थात प्रतिकृती) मोहिमेसाठी अनिमा यांची निवड झाली होती. सुमारे १४ दिवसांची मोहीम होती. या मोहिमेसाठी निवड म्हणजे भविष्यात अनिमा यांची अंतराळवीर म्हणून निवड होण्यासाठी पडलेले एक पाऊल.
अनिमा पाटील-साबळे या मूळच्या जळगावच्या रहिवासी आहेत. अनिमा यांच्यासोबत या मोहिमेमध्ये आणखी एक महिला अंतराळवीर डेब्रो होजेस, याशिवाय फ्लाइट इंजिनियर सॅम्युअल वॉल्ड, मोहिमेचे तज्ज्ञ सॅमसन फास असे एकूण चार जण होते. जून २०१५ पासून ह्यूस्टन शहरातील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये ही मोहीम पार पडली. संस्था 'नासा'च्या सिम्युलेटेड (अर्थात प्रतिकृती) मोहिमेसाठी अनिमा यांची निवड झाली होती. सुमारे १४ दिवसांची मोहीम होती. या मोहिमेसाठी निवड म्हणजे भविष्यात अनिमा यांची अंतराळवीर म्हणून निवड होण्यासाठी पडलेले एक पाऊल. अनिमा पाटील-साबळे या मूळच्या जळगावच्या रहिवासी आहेत. अनिमा यांच्यासोबत या मोहिमेमध्ये आणखी एक महिला अंतराळवीर डेब्रो होजेस, याशिवाय फ्लाइट इंजिनियर सॅम्युअल वॉल्ड, मोहिमेचे तज्ज्ञ सॅमसन फास असे एकूण चार जण होते. जून २०१५ पासून ह्यूस्टन शहरातील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये ही मोहीम पार पडली.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा
1. मोहीम कशासाठी ?
2. सिम्युलेटेडमिशन म्हणजे काय ?
3.अंतराळ मोहिमेत निवड झालेली अनिमा तिसरी भारतीय महिला...
4.पतीच्या प्रोत्साहनामुळे पंखांना मिळाले बळ...