आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या जळगाव विभागास साडेचार लाखांचे बक्षीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रवासी वाढवा अभियानांतर्गत जळगाव विभागाने साडेचार लाखांचे बक्षीस मिळवले आहे. यात वाहकांना वैयक्तिक व आगारांना सामूहिक बक्षिसांचा समावेश आहे. या मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेचा विनियोग कर्मचार्‍यांच्या सुविधेसाठी व्हावा, अशी अपेक्षाही कर्मचार्‍यांमधून व्यक्त केली जात आहे.

कुलर, इन्व्हर्टरवर होईल खर्च
तोट्यात चाललेल्या राज्य परिवहन महामंडळाचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी महामंडळाने कर्मचारी व आगारांना दिलेले उद्दिष्ट साध्य करणार्‍यांना बक्षिसे जाहीर केली होती. विभागनिहाय ही बक्षिसे देण्यात आली आहेत. या अंतर्गत 2011 या वर्षातील निकाल महामंडळाने जाहीर केला आहे. यात विभागातील पाच वाहकांना 5 हजारांचे वैयक्तिक बक्षिसेही दिली आहेत. मार्च 2011 या महिन्यात सर्वाधिक उत्पन्नाचे उद्दिष्ट वाहकांना व विभागातील आगारांना दिले होते. एसटीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आकृष्ट करणे, योग्य त्या सुविधा देणे व या माध्यमातून उद्दिष्टपूर्ती करणे हे या अभियानाचे वैशिष्ट होते. या वर्षातही मार्च महिन्यात हे अभियान राबवण्यात आले आहे. या वर्षाचा निकाल अद्याप प्राप्त नसल्याचे आगाराच्या सूत्रांनी सांगितले. आगारांना मिळालेल्या रकमेतून कर्मचारी आपल्या कार्यालयात कुलर, इन्व्हर्टर, संगणकासह बॉटल कुलर आदी सुविधा घेऊ शकणार आहेत. यासाठी कर्मचारी समिती तयार करून त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
अशी आहेत बक्षिसे
जानेवारी 2011 सर्वोत्कृष्‍ट विभाग : जळगाव- प्रथम क्रमांक एरंडोल आगार. (एक लाख रुपये), द्वितीय- मुक्ताईनगर आगार (75 हजार रुपये)
फेब्रुवारी 2011 सर्वोत्कृष्‍ट विभाग : जळगाव - प्रथम क्रमांक जामनेर आगार ( एक लाख रुपये), द्वितीय क्रमांक- एरंडोल आगार (75 हजार रुपये), तृतीय क्रमांक- चाळीसगाव आगार ( 50 हजार रुपये)
या वाहकांना मिळाले 5 हजारांचे बक्षीस : एम.के.चौधरी (जामनेर), एन.एस.त्रिभुवन (चाळीसगाव), आर.आर.सूर्यवंशी (रावेर), ए.जे.अंबोले (भुसावळ), ए.आर.वाणी (एरंडोल). धुळे विभाग- आर.एस.शिसोदे (धुळे), एस.एन.सोनवणे (साक्री), बी.एन.अहिरे (शिंदखेडा), बी.एस.पाटील (शिरपूर).