आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon Dhanaji Nana Choudhari Social Work College Youth Worksop

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसदीय लोकशाहीमध्ये युवकांनी सहभाग घ्यावा, लोकप्रतिनिधींकडून राजकारणाच्या टिप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भारतीय संसदीय लोकशाहीचे महत्त्व वाढविण्यासाठी सक्षम युवकांनी सहभागी होण्याची गरज आहे. या माध्यमातून ही संसदीय लोकशाही उज्‍जवल होणार असल्याचा सूर धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संचालित समाजकार्य महाविद्यालयात झालेल्या तीन दिवसीय युवा संसद कार्यशाळेत निघाला.

माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य विष्णू भंगाळे, संस्थेचे सचिव डॉ. पी.आर.चौधरी, प्रभारी प्राचार्य डॉ. वाय.जी.महाजन उपस्थित होते.

समाजातील शेवटच्या स्तरातील माणसाचा विकास होत नाही, तोपर्यंत खर्‍या अर्थाने लोकशाही अस्तित्वात येणार नाही. युवकांनी तारुण्याचा उपभोग घेताना पुढील आयुष्याचीही गुंतवणूक करावी. विधानसभेच्या कामकाजात विधानसभा अध्यक्षांच्या जबाबदार्‍या, प्रस्तावाचे प्रकार, निधीचे प्रकार, तारांकित-अतारांकित प्रश्न या संबंधी माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी या टिप्स दिल्या.

विधिमंडळ हे कायदेनिर्मितीचे शस्त्र

विधिमंडळातील कायदा निर्मितीची प्रक्रिया ही महत्त्वपूर्ण मानली जाते. देशातील सत्ता परिवर्तनात नागरिकांच्या मतांचे महत्त्व सांगून देशात बदल घडवून आणायचा असेल तर सर्वांनी आधी आपल्यात बदल करणे गरजेचे आहे. लोकशाहीत अधिकारांचा वापर कमी मात्र तो जरूर झाला पाहिजे, त्याचबरोबर कर्तव्य दुपटीने पार पाडली पाहिजेत. विधिमंडळ हे कायदानिर्मितीचे शस्त्र आहे, असे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात आमदार संजय सावकारे यांनी ‘विधानभवनातील कामकाजाची तंत्रे व विविध पद्धती’ या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव प्रा.डॉ. पी.आर.चौधरी यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. नितीन बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.