आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळा तालुक्यात विद्युत सहायकास लाच घेताना पकडले; धुळे एसीबीची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: वीजजोडणी संदर्भातील कारवाई टाळण्यासाठी 2 हजार ६०० रुपयांची लाच घेणाऱ्या विद्युत सहायक गीतकुमार शिरसाठ याला शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले. मोंढाळे बसथांब्याजवळ ही कारवाई झाली. तालुक्यातील मोंढाळ्यात पोलवरून वीज घेऊन तक्रारदार विजेच्या मोटारीने पिकांना पाणी देतात. त्यावेळी विद्युत सहायक गीतकुमार शिरसाठ याने तक्रारदाराच्या शेतात येऊन तक्रारदार त्यांचे चुलत बंधू यांच्या शेतातील खांब्यावरील विजेची केबल काढून नेली. तसेच वीजजोडणी संदर्भातील कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजार ३०० अशी एकूण 2 हजार ६०० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी मोंढाळे बसथांब्याजवळ सापळा रचला. त्यात त्याला हजार ६०० रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.